‘एनएचएम’ कंत्राटी कर्मचा-यांचा पुन्हा ‘एल्गार’!
By admin | Published: October 14, 2016 02:04 AM2016-10-14T02:04:10+5:302016-10-14T02:04:10+5:30
काम बंद आंदोलन; विनाशर्त समायोजनाची मागणी
अकोला, दि. १३- अनुभवाच्या आधारे नियमित शासकीय सेवेत बिनशर्त समायोजन आणि समायोजनाची प्रक्रिया होईपर्यंंंत 'समान काम-समान वेतन' या दोन प्रमुख मागण्या अभियान संचालक व आरोग्य विभागाने फेटाळून लावल्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम)च्या कंत्राटी कर्मचारी, अधिकार्यांच्या संघटनेने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आपल्या आंदोलनास नवी धार देण्यासाठी एनएचएम कंत्राटी अधिकारी व कर्मचारी महासंघाच्यावतीने राज्यभरात जिल्हा परिषदांसमोर धरणे देण्याची हाक देण्यात आली होती. त्यानुषंगाने महासंघाच्या अकोला शाखेच्यावतीने गुरुवार, १३ ऑक्टोबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकदिवसीय धरणे देण्यात आले.
या अभियानांतर्गत हजारो कर्मचारी अनेक वर्षांंंंपासून कंत्राटी तत्त्वावर तुटपुंजा मानधनावर कार्यरत आहेत. या अभियानांतर्गत जिल्हय़ात ३२५ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.
अनुभवाच्या आधारे नियमित शासकीय सेवेत बिनशर्त समायोजन आणि समायोजनाची प्रक्रिया होईपर्यंंंंत ह्यसमान काम-समान वेतनह्ण या दोन प्रमुख मागण्यांसाठी ह्यएनएचएमह्णचे कंत्राटी कर्मचारी २0१२ पासून आंदोलन करीत आहेत. शासनाने या कर्मचार्यांच्या मागण्या फेटाळून लावल्या. त्यामुळे संघटनेने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून गुरुवारी जिल्हाभरातील एनएचएम कर्मचार्यांनी 'काम बंद' आंदोलन करून येथील जिल्हाधिकारी परिसरात एकदिवसीय धरणे दिले. संघटनेच्या पदाधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले. धरणे मंडपात संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज कडू, उपाध्यक्ष सचिन उनवणे, कोषाध्यक्ष सचिन डांगे, कार्याध्यक्ष अंकुश गंगाखेडकर व उमेश ताठे आदी उपस्थित होते.