पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात ‘एल्गार’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:13 AM2021-06-27T04:13:47+5:302021-06-27T04:13:47+5:30
अकोला : मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या शासन निर्णयाविरोधात एल्गार पुकारत , आरक्षण रद्द करण्याचा निर्णय ...
अकोला : मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या शासन निर्णयाविरोधात एल्गार पुकारत , आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी आरक्षण हक्क कृती समिती जिल्हा शाखेच्यावतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री व राज्यपालांकडे सादर करण्यात आले.
राज्यातील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय शासनामार्फत ७ मे २०२१ रोजी निर्गमीत करण्यात आला. हा शासननिर्णय मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा असल्याने, पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय शासनाने तातडीने मागे घेऊन, रिक्त जागा पदोन्नतीने भरण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी करीत आरक्षण हक्क कृती समिती अकोला जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री व राज्यपालांकडे सादर करण्यात आले.
यावेळी सेवानिवृत्त सनदी अधिकारी विश्वनाथ शेगावकर यांच्यासह डाॅ. बाबासाहेब आंबेडकर इंजिनिअरिंग असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बी. एस. अंबाळकर, प्रमोद कळंबे, आदिवासी अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश मडावी, मागासवर्गीय स्वतंत्र अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय गवई, धनगर अधिकारी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष एम.आर.भदे, भारतीय बौध्द महासभा जिल्हाध्यक्ष पी.जे.वानखडे, जिल्हा महासचिव डाॅ. एम. आर. इंगळे, आक्रमण संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरज मेश्राम, बामसेफचे जिल्हाध्यक्ष धीरज गणवीर, एच. बी. कोकणे, पाटबंधारे बहुजन कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र
अरखराव, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी. डी. दहातोंडे, कनिष्ठ अभियंता संघटनेचे जिल्हाध्यक्ष ए.एम.गिरी, मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे विदर्भ प्रमुख सुनील तायडे, युवा मुक्ती संघटनेचे अध्यक्ष मनोज भालेराव, कास्ट्राईब संघटनेचे जिल्हा महासचिव देवानंद डोंगरे, पीकेव्ही कर्मचारी कल्याण महासंघाचे डाॅ. राजेंद्र गोडे, राजेंद्र वाळके, अण्णा भाऊ साठे कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष ललित अंभोरे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर टीचर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डाॅ. संदीप भोवते यांच्यासह
आरक्षण हक्क कृती समिती अंतर्गत विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
.......................फोटो.......................