चोहोगावच्या महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार
By admin | Published: July 5, 2016 01:18 AM2016-07-05T01:18:44+5:302016-07-05T01:18:44+5:30
महिलांनी आकोट पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय गाठून केली आपबिती कथन.
सायखेड (जि. अकोला): धाबा पोलीस चौकीच्या हद्दीत येणार्या चोहोगाव, सायखेड, धामणदारी येथे अवैध गावठी दारूचा महापूर असून ही दारू बंद करण्यासाठी महिला ग्रामस्थांनी १ जुलै रोजी थेट पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय गाठून आपबिती कथन केली. दारू पिऊन आल्यानंतर घरामध्ये विनाकारण वाद सुरू होतात. याचा परिणाम विद्यार्थ्यांंवरसुद्धा होतो. वेळप्रसंगी वादाचे रूपांतर मारामारीत होते. यामुळे गंभीर प्रकार होण्याची शक्यताही असते. पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दारूचे प्रमाण वाढतच चालले आहे. याला आळा घालण्यासाठी महसूल व पोलीस विभागाने त्वरित कारवाईसाठी पाऊले उचलावीत, अशी मागणी महिलांनी दिलेल्या निसेदनातून केली आहे. त्यावर सरपंच लिलाबाई अशोक कोहर, मंजुळा इंगळे, उज्ज्वला इंगळे, तंटामुक्त समितीचे बबन इंगळे, संघपाल चक्रनारायण, उमेश इंगळे, मालन इंगळे, पद्मिनी इंगळे, अस्मिता घुगे, विशाखा धाडसे, रेशमा इंगळे, शांताबाई इंगळे, निर्मला इंगळे, सुमन इंगळे, कलाबाई वाकोडे, केशर इंगळे आदींच्या सह्या आहेत. सदर निवेदन तहसीलदार राजेंद्र जाधव व पो. स्टे. मध्ये जाऊन देण्यात आले.