जुनी पेन्शन व प्रचलित अनुदानाबाबत शिक्षकांवरील अन्याय दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:13 AM2021-06-22T04:13:40+5:302021-06-22T04:13:40+5:30

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित व टप्पा अनुदानित शिक्षकांवर जुनी पेन्शनबाबत झालेला अन्याय त्वरित दूर करावा. १ नोव्हेंबर ...

Eliminate injustice on teachers regarding old pensions and prevailing grants | जुनी पेन्शन व प्रचलित अनुदानाबाबत शिक्षकांवरील अन्याय दूर करा

जुनी पेन्शन व प्रचलित अनुदानाबाबत शिक्षकांवरील अन्याय दूर करा

Next

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित व टप्पा अनुदानित शिक्षकांवर जुनी पेन्शनबाबत झालेला अन्याय त्वरित दूर करावा. १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. अघोषितसह उ. मा. शाळांना प्रचलित पद्धतीने अनुदान द्यावे. शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी तोवर सरसकट निवड श्रेणी द्यावी. कोविड-१९ मुळे विद्यार्थी पटसंख्या निकष बदलावेत. ६ व्या व ७ व्या वेतन आयोगाचे थकीत वेतन अदा करावे. वैद्यकीय प्रतिपूर्ती कॅशलेसद्वारे मिळावी. सेवानिवृत्तीची प्रकरणे त्वरित निकाली काढावीत. असंवैधानिक त्रयस्थ शिक्षक मूल्यमापन रद्द करा. सेवांतर्गत प्रशिक्षण त्वरित घ्यावे. विद्यार्थी हितास्तव शिक्षक भरती त्वरित करावी. वेतन निधीबाबत असलेली अनियमितता त्वरित दूर करावी. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती त्वरित द्यावी. ऑनलाइन शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना आर्थिक मदत द्यावी. आदींसह मागण्यांचे निवेदन प्रा. विनय काळे, प्रा. शेवतकर, प्रा. मंगेश कांडलकर यांनी दिले.

Web Title: Eliminate injustice on teachers regarding old pensions and prevailing grants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.