रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमणाचा सफाया
By admin | Published: June 29, 2014 12:41 AM2014-06-29T00:41:46+5:302014-06-29T00:48:06+5:30
अकोला महापालिकेने ‘अतिक्रमणमुक्त अकोला’ मोहीम शनिवारीही सुरूच ठेवली.
अकोला : महापालिकेने 'अतिक्रमणमुक्त अकोला' मोहीम शनिवारीही सुरूच ठेवली. मध्यवर्ती बस स्थानक ते रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. दुकानांच्या बाहेर आलेल्या पायर्या, व्यापार्यांनी रस्त्यावर लावलेले पेवर्स ब्लॉक, टाइन्स, फ्लोअरिंगही तोडण्यात आले. गत पाच दिवसांपासून महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र केली आहे. गजानन मार्केटमधील अवैध बांधकाम पाडल्यानंतर मनपाने मोहम्मद अली रोड, टॉवर ते फतेह चौक या दरम्यानचे अतिक्रमण हटविले. दरम्यान, शनिवारी मुख्य डाकघराजवळून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली. मध्यवर्ती बस स्थानकाजवळ असलेली खाद्य पदार्थ आणि पाठय़पुस्तके, मासिक, वृत्तपत्र विक्रीची दुकाने हटविण्यात आली. टॉवर चौकातील भारतीय स्टेट बॅँकेच्या आवारभिंतीजवळ असलेली फूल विक्रेत्यांची दुकाने पुन्हा हटविण्यात आली. स्टेशन चौक स्थित लोकप्रभा भोजनालय, जैन कटलरी, गुजराती स्वीट मार्ट, आनंद भोजनालयाबाहेर असलेल्या पायर्या तोडण्यात आल्या. गुप्ता टी स्टॉलसह रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली पानटपरीही हटविण्यात आल. स्वाद बेकरी, मोटर गॅरेज, बिर्ला रोड, दुर्गा चौकातील अतिक्रमण हटविण्यात आले. मोहिमेत मनपाचे विशेष कार्य अधिकारी जी. एम. पांडे, उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे, अधिकारी अनिल बिडवे, के. पी. पुंडे, राजेंद्र घनबहादूर, नगर रचना विभागातील अभियंता संदीप गावंडे, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख विष्णू डोंगरे, अग्निशमन दलातील अधिकारी आर. के. ठाकरे, जितेंद्र तिवारी, प्रवीण मिश्रा आदी सहभागी झाले होते.