५० कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत कामात अपहार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:57 AM2021-01-08T04:57:51+5:302021-01-08T04:57:51+5:30

प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे, तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक लाड यांच्यासह वनपाल, वनरक्षक यांनी संगनमत करून बार्शीटाकळी तालुक्यातील परंडा नियत ...

Embezzlement in work under 50 crore tree planting scheme! | ५० कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत कामात अपहार!

५० कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत कामात अपहार!

Next

प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे, तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक लाड यांच्यासह वनपाल, वनरक्षक यांनी संगनमत करून बार्शीटाकळी तालुक्यातील परंडा नियत क्षेत्रातील कक्ष क्र. बी ११७ व बी ११८ मधील १५ हेक्टर रोपवनातील रोपांच्या निंदनाच्या कामावर सप्टेंबर २०१७ मध्ये शुभम अरुण उमक याला मस्टरनुसार कामावर दाखविले, परंतु हा विद्यार्थी या कालावधीत अकोला येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हजर असल्याचे हजेरी पटावरून सिद्ध झाल्याचे माहिती अधिकारात उघड झाले. यावरून रोपवनात निंदनाचे काम न करता मजुरीचे पैसे काढले, याबाबतची तक्रार केल्यानंतर चौकशी करताना थातूरमातूर एकतर्फी चौकशी करून सहायक वनसंरक्षक (वने) यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप गोपाल राठोड यांनी केला. यावरून रोपवनातील कामात अपहार झाला असून, शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याचे समजते. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर चौकशीअंती गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारकर्त्याने केली. विशेष म्हणजे ही तक्रार दाखल करण्यापूर्वी तक्रारकर्त्याने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्याकडे परवानगी मागण्यासाठी दि. २१.१०.२०२० रोजी पुराव्यासह लेखी विनंती अर्ज पाठविला होता.

दगडपारवा रोपवाटिकेच्या कामात झाली होती अनियमितता

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत डिसेंबर २०१९ मध्ये दगडपारवा येथील वन विभागाच्या रोपवाटिकेच्या कामात अनियमितता आढळून आल्याने तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक लाड यांच्यावर निलंबनाचाी कारवाई करून विभागीय चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २० जानेवारी २०१९ रोजी अकोला उपवनसंरक्षक यांना दिले होते. रोहयोचे उपजिल्हाधिकारी व अभियंत्यांच्या पथकामार्फत या कामाची तपासणी ४ डिसेंबर २०१९ रोजी केली असता रोपवाटिकेत कामाच्या ठिकाणी मजुरांचे हजेरीपत्रक उपलब्ध नसणे, रोपासंदर्भात कोणतेही रजिस्टर, कामाच्या नावाचे दर्शनिय फलक न लावणे आदींसह रोपांची गुणवत्ता खराब आढळून आली होती. चौकशीअंती अहवालाच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयाने ११ डिसेंबर २०१९ रोजी कारणे दाखवा नोटीस विवेक लाड यांना बजावण्यात आली, परंतु त्याचे उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले नव्हते.

-------काेट--------

वृक्ष लागवड याेजनेच्या अंतर्गत अपहार झाल्याची तक्रार प्राप्त झाली असून, ती चाैकशीत ठेवली आहे. या याेजनेत अपहार झाला असेल तर संबंधित विभागाने तक्रार नाेंदविणेच नियमानुसार याेग्य असेल.

- प्रकाश पवार, ठाणेदार, पाे. स्टे. बार्शिटाकळी

Web Title: Embezzlement in work under 50 crore tree planting scheme!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.