उसनवारीच्या पैशातून आपत्कालीन वाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:56 AM2017-08-17T01:56:39+5:302017-08-17T02:07:14+5:30
अकोला : जिल्हा प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीच्या हाकेला ‘ओ’ देत तत्काळ धावून जाणारा धेय्यवादी तरुणांचा हा संच. तब्बल १२ वर्षांपूर्वी म्हणजेच वर्षभर कार्यरत असतो. २00३ मध्ये अकोला जिल्ह्यातील बाश्रीटाकळी तालुक्यातल्या पिंजर गावातल्या दीपक सदाफळे या सामाजिक विचारांनी भारलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने लोकांना जीवन देणार्या या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीच्या हाकेला ‘ओ’ देत तत्काळ धावून जाणारा धेय्यवादी तरुणांचा हा संच. तब्बल १२ वर्षांपूर्वी म्हणजेच वर्षभर कार्यरत असतो. २00३ मध्ये अकोला जिल्ह्यातील बाश्रीटाकळी तालुक्यातल्या पिंजर गावातल्या दीपक सदाफळे या सामाजिक विचारांनी भारलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने लोकांना जीवन देणार्या या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. या चळवळीच्या जन्माला एक छोटी घटना कारणीभूत ठरलीय. दीपकच्या पिंजर गावातील एका व्यक्तीचा वेळेवर दवाखान्यात नेता आले नाही म्हणून मृत्यू झालाय. एक कुटुंब उघडं पडलंय. नेमके याच घटनेच्या अस्वस्थेतून दीपकने पुढचे आयुष्य लोकांना जीवन देण्याच्या कामात खर्ची घालण्याचा निश्चय केलाय. त्याच्या या विचाराला गावातील २0 मित्रांनी उचलून धरले अन् याच विचारातून ‘गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथका’चा जन्म झाला. गेल्या बारा वर्षांपासून एक रुपयाची सरकारी मदत न घेता या पथकाने निरंतर आपला सेवायज्ञ सुरू केलाय. आधी २0 जणांपासून सुरू झालेल्या या चळवळीचा आता वटवृक्ष झाला. सध्या या पथकामध्ये ५५0 सेवक आहेत. त्यापैकी १३0 सेवक सर्व प्रकारच्या प्रशिक्षणांनी सज्ज आहेत. ७0 सेवकांना प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पथकातील जवळपास सर्वच सदस्य सर्वसामान्य घरातील शेती करणारे, मजुरी करणारे, उदरनिर्वाहासाठी स्वत:चा व्यवसाय करणारे आहेत. ते आपल्या दैनंदिन कमाईतला नियमित वाटा या चळवळीला देत असतात. त्यातूनच या कामाचा खर्च भागविला जातोय. तीन-चार वर्षांपासून या पथकाने स्वत:ची अँम्बुलंस गाडी घेतली. या अँम्बुलंसने आतापयर्ंत अनेक रुग्णांना जीवनदान दिले. कधीकधी गाडीत डीझेल भरायचेही वांदे असतात; परवा या पथकाने तीन लाख चाळीस हजाराची जुनी बोलेरो विकत घेतली. ही रक्कम उभी करण्यासाठी २ लाख रुपये गावातून उसने घेतले तर दीपक सदाफळे यांच्या पत्नी राधिका शिवणकाम करतात. त्यानी या कामातून मिळालेल्या पैशातून दागिणे घेण्यासाठी ५0 हजार जमा केले होते. त्यांनी दागिने घेण्याऐवजी ही रक्कमसुद्धा वाहनासाठी देऊन पतीची सर्वार्थाने ‘अर्धांगिणी’ असल्याचे प्रत्यंतर दिले आहे.
जिल्ह्यात कुठेही नैसर्गिक आपत्ती आली, नागरिक पाण्यात अडकले किंवा आगीत सापडले, रुग्णाला तातडीने दवाखान्यात पोहोचवायचे, अडकलेल्या वन्य प्राण्याचे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ करायचे, या सर्व संकटांतून बाहेर पडण्याच्या मदतीसाठी फक्त आणि फक्त एकच नाव असतंय, ते म्हणजे ‘ गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक. या पथकाच्या ताफ्यात केवळ एकच वाहन आहे आणि तिही रुग्ण्वाहिका. मदतीसाठी कुणाचाही फोन आला की, हे पथक कुठलेही कारण न सांगता मिळेल त्या वाहनाने घटनास्थळी धाव घेते, कुठल्याही मोबदल्याची आशा नसताना या पथकाचे असे मदतकार्य अहोरात्र सुरू आहे. या पथकाला आपत्कालीन वाहनाची गरज होती. ही गरज परवा पूर्ण झाली असून, या पथकाचे प्रमुक दीपक सदाफळे यांनी पत्नीने दागिने घेण्यासाठी जमा केलेले पैसे दिले, तर काही उसनवारी करून वाहनाची खरेदी केली आहे.
संवेदनशील दातृत्वाने पुढे यावे!
अकोला जिल्हाच नाही तर उत्तराखंडमधील जलप्रलय असो की माळीणची दुर्घटना, गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक सर्वच ठिकाणी मदतीसाठी समोर आणि तत्पर होतंय. पुरात अडकलेले लोक असोत की विहिरीत पडलेला बिबट्या, सर्वांना जीवनदान देण्याचे काम या चळवळीने केले आहे. या तरुणांच्या कार्यासाठी संवेदनशिल नागरिकांनी नेहमीच मदतीचा हात दिला आहे. आताही सरकार आणि समाजाने लोकांना जीवनदान देणार्या या धेय्यवादी आणि कर्मवेड्या तरुणांच्या चळवळीला बळ आणि ताकद देणे आवश्यक आहे.