मसाले, सुगंधी वनौषधी लागवडीवर भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 02:11 PM2020-02-16T14:11:01+5:302020-02-16T14:11:10+5:30

कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन औषधी वनस्पती उद्यानात तिखाडी तेल प्रकल्प उभा केला आहे.

Emphasis on cultivating spices, aromatic herbs! | मसाले, सुगंधी वनौषधी लागवडीवर भर!

मसाले, सुगंधी वनौषधी लागवडीवर भर!

googlenewsNext

अकोला : राज्यातील मसाला पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये सातत्याने वाढ होत आहे. सुगंधी औषधी वनस्पती पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावे, यासाठीचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रयत्न सुरू आहेत. विदर्भात सुगंधी औषधी वनस्पतीच्या व्यावसायिक शेतीवर भर देण्यात येत असून, या कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन औषधी वनस्पती उद्यानात तिखाडी तेल प्रकल्प उभा केला आहे. यानुषंगाने शेतकऱ्यांना या पिकांच्या ‘शाश्वत शेतीसाठी अद्ययावत उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर अकोल्यात दोन दिवस मंथन होणारआहे.
या प्रकल्पाचा आदर्श घेत विदर्भातील मोजक्या शेतकºयांनी सध्या तिखाडी तेल गवताची व्यावसायिक शेती सुरू केली आहे. अंजनगाव सुर्जी येथील शेतकºयांनी तिखाडी तेल निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे. नागपूर जिल्ह्यातील शेतकºयांनी माईनमुळा (कोलिअस) या औषधी वनस्पतीचा शेती प्रयोग केला. भंडारा, वर्धा जिल्ह्यात वनस्पतीची लागवड करण्यात येत आहे. या शेतीला व्यापक स्वरू प देण्यासाठी कृषी विद्यापीठाने मोहीम हाती घेतली असून, शेतकºयांनी सुगंधी वनस्पतीची व्यावसायिक लागवड करावी, यासाठीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणाºया या चर्चासत्रामध्ये मसाला व सुगंधी वनस्पती पिकांबाबत अद्ययावत उत्पादन तंत्रज्ञान, पीक संरक्षण, मसाला व सुगंधी वनस्पती पिकांचे मूल्यसंवर्धन तथा प्रक्रिया, विपणन व स्वयंरोजगाराच्या संधी आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


 तिखाडी गुणकारी
तिखाडी हे तेल गुणकारी असून, गुडघे, सांधेदुखीवर या तेलाचा उपयोग करण्यात येतो. नागार्जुन औषधी वनस्पती उद्यानात तिखाडी तेल निर्मिती प्रकल्प असून, माफक दरात तिखाडी तेलाचा पुरवठा गरजवंतांना उपलब्ध करण्यात येत आहे.

नागार्जुन उद्यानात ५०० वनस्पतींचे जतन
वनस्पती औषधी शेतीचा प्रसार मोठ्या प्रमाणात व्हावा, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन वनस्पती उद्यानात सुगंधी औषधी वनस्पतीची रोपे व बियाणे शेतकºयांसाठी ठेवण्यात आली आहेत. यात कोरफड, शतावारी, क रंज, बिहाडा, गुग्गुळ, अडुळसा, पानफुटी, निरगुडी, सुगंधी गवत, तिखाडी, खस (वाळा), ही रोपे तर कौचा, अश्वगंधा, अक्कलकारा, बिक्झा इत्यादींच्या बियाण्यांचा समावेश आहे.

 

Web Title: Emphasis on cultivating spices, aromatic herbs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.