कृषी संशोधन, तंत्रज्ञान गावपातळीवर पोहोचविण्यावर भर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 03:25 PM2020-03-08T15:25:13+5:302020-03-08T15:25:37+5:30
कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी गावपाळीवर शेतकऱ्यांना इत्थंभूत माहिती देत आहेत.
अकोला : विकसित संशोधन, तंत्रज्ञान गावपातळीवर पोहोचविण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने भर दिला असून, याकरिता देशात उच्च कृषी शिक्षण बळकटीकरण आणि विकास विद्याशाखा कार्यान्वित करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने विदर्भात करण्यात येत असून, कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी गावपाळीवर शेतकऱ्यांना इत्थंभूत माहिती देत आहेत.
२०२२ पर्यंत शेतमाल उत्पादन दुप्पट करण्यावर केंद्र शासनाने भर दिला आहे. याच अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, गावपातळीवर जाऊन विविध कार्यशाळा, प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके आयोजित करू न मनुष्यबळ विकास कार्यक्रम राबवित आहेत. यामध्ये पीक उत्पादनाच्या वाढीसह कृषी प्रक्रिया आधारित उद्योग निर्मिती यावरही भर देण्यात येत आहे. शुक्रवारी भेडगाव येथे एक दिवसीय शेतकरी कार्यशाळा घेण्यात आली. कृषी प्रक्रिया उद्योग कसे निर्माण करायचे, याबाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. बियाणे, सोयाबीन प्रक्रिया व मूल्यवर्धन, शेतमालावर प्रक्रिया करू न त्याचे विपणन आदींबाबत शेतकºयांना माहिती देण्यात आली. कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे, डॉ. प्रमोद बकाणे, अभियंता उद्धव कंकाळ, कुलदीप जाधव, डॉ. अनिल कांबळे, डॉ. किशोर घरडे तसेच भेडगावचे अनिल भगत यांनीही शेतकºयांना तंत्रज्ञान व संशोधनाची माहिती दिली.