अकोला जिल्ह्यात जैविक शेती मिशन राबविण्यावर भर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 02:13 PM2020-02-18T14:13:30+5:302020-02-18T14:13:37+5:30
विविध पिकांच्या उत्पादनासह आता तेलबिया उत्पादन चळवळ राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विषमुक्त अन्न निर्मितीसाठी जिल्ह्यात जैविक शेती मिशन राबविण्यात येत असून, कीटकनाशकांवर होणारा खर्च कसा टाळता येईल, यावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी नियोजन भवनात आयोजित यशोगाथा कार्यक्रमात केले. खारपाणपट्ट्यातील जमिनीची प्रत सुधारण्यासाठी प्रतिहेक्टर १० मे. टन (जिप्सम) भुसाधरके देण्याची मागणी त्यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री पुरुषोत्तम रू पानी यांच्यक डे केली. दरम्यान, याप्रसंगी कृषी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शास्त्रज्ञ, अधिकाऱ्यांचा सत्कार ना. रू पानी यांच्या हस्ते करण्यात आला.
कड, गळीत धान्य पिकांच्या स्थानिक वाणाच्या बीजोत्पादनावर भर देण्यात येत असून, शेतकरी गट, उत्पादक कंपन्यांना पायाभूत बियाणे खरेदीसाठी १५ हजार रुपये शंभर टक्के अनुदावर उपलब्ध करू न द्यावे, भविष्यातील विषबाधा टाळण्यासाठी ५० फवारणी यंत्रे ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करू न द्यावे, शेतकरी गटांना यासाठी ८० टक्के अनुदान देणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाºयांनी नमूद केले. जिल्ह्यात विविध शेती प्रबोधन कार्यक्रम सुरू आहेत. डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. भाले यांनी कृषी विद्यापीठाकडे विकसित तंत्रज्ञान उपलब्ध असल्याचे सांगितले. बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. विविध पिकांच्या उत्पादनासह आता तेलबिया उत्पादन चळवळ राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरू षोत्तम रू पानी यांच्या हस्ते शेतकºयांचे उत्पादन वाढविण्यासाठी काम करणाºया कुलगुरू डॉ. भाले, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांच्यासह संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर, बुलडाणा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. चंद्रकांत जायभाये, कीटकशास्त्र विभागचे डॉ. उपेंद्र कुलकर्णी, यवतमाळ कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ, डॉ. सुरेश नेमाडे, बुलडाणा कृषी विज्ञान केंद्राचे मका पैदासकार डॉ. दिनेश कानडे व यवतमाळ कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ डॉ. मगर या शास्त्रज्ञांनाचा सत्कार करण्यात आला.