नागरी सुरक्षा, स्मार्ट पोलिसींग, क्यूआर कोड पेट्रोलिंगवर देणार भर- बच्चनसिंग यांची ग्वाही
By नितिन गव्हाळे | Published: January 2, 2024 06:17 PM2024-01-02T18:17:39+5:302024-01-02T18:17:52+5:30
आज स्वीकारली अकोला पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे
नितीन गव्हाळे, अकोला: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच नागरी सुरक्षा महत्वाची आहे. त्या दृष्टीकोनातून स्मार्ट पोलिसींग करण्यासोबतच क्युआर कोड पेट्रोलिंगवर भर देणार असल्याचे जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. संदीप घुगे यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी बच्चनसिंग यांनी २ जानेवारी रोजी सकाळी १२ वाजता मावळते पोलिस अधीक्षक घुगे यांच्याकडून पोलिस अधीक्षक पदाची सुत्रे स्विकारली. संदीप घुगे यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना, बच्चनसिंग यांनी, शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम महत्वाचे आहे. शहरासोबतच जिल्ह्यातील अवैध धंदे बंद खपवून घेतले जाणार नाहीत. गाेवंश तस्करी, अवैध गुटखा विक्रीला कसा प्रतिबंध करता येईल आणि नागरिकांना सुरक्षिततेचे वातावरण प्रदान करणे, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून, गुन्हेगारी, भयाचे वातावरण संपुष्टात आणण्यासाठी काम करू असे स्पष्ट करीत, त्यांनी, एमपीडीए, तडीपारच्या कारवायाही सुरूच राहतील. वाशिम येथे कार्यरत असताना, क्युआर कोड पेट्रोलिंगवर अधिक भर देण्यात आला होता. अकोल्यातही त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच एमइआरएस डायल ११२ ही योजनाही प्रभावीपणे राबविण्यात येईल. असेही पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, पोलिस निरीक्षक विजय नाफडे, एपीआय कैलास भगत, एपीआय महेश गावंडे, पीएसआय गोपाल जाधव आदींनी त्यांचे स्वागत केले.