अपारंपरिक पीक उत्पादनावर भर - मोहन वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:49 PM2020-02-15T12:49:26+5:302020-02-16T12:17:30+5:30

शेतीविषयक माहिती देण्यास कृषी विभाग तत्पर असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Emphasis on unconventional crop production | अपारंपरिक पीक उत्पादनावर भर - मोहन वाघ

अपारंपरिक पीक उत्पादनावर भर - मोहन वाघ

Next

- राजरत्न सिरसाट

अकोला : जिल्ह्यात कृषी विकासाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून, अपारंपरिक पिके उत्पादनावर भर देण्यात येत आहे. कीटकनाशके फवारणीसंदर्भात शेतकºयांचे प्रबोधन करण्यात येत असून, विषबाधा झालेल्या शेतमजूर, शेतकºयांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. पारंपरिक पिकांसोबतच आता अपारंपरिक पीक उत्पादनासंदर्भात शेतकºयांचे प्रबोधन करण्यात येत आहे. येत्या खरीप हंगामात शेतकºयांना शेतीविषयक माहिती देण्यास कृषी विभाग तत्पर असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

प्रश्न: यावर्षीच्या खरीप हंगामाचे नियोजन कसे असणार?

उत्तर: गतवर्षी आॅक्टोबरपर्यंत पीक चांगले होते. आॅक्टोबर महिन्यानंतरही सतत पाऊस सुरू राहिल्याने विशेषत: सोयाबीन पीक, बीजोत्पादन क्षेत्रावर परिणाम झाला आहे. म्हणूनच यावर्षी घरचे सोयाबीन बियाणे वापरण्यासंदर्भात शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या पिकासोबतच आता अपारंपरिक पीक लागवडीकरिता शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत असून, शेतकºयांचा प्रतिसाद मिळत आहे.

प्रश्न: कोणती अपारंपरिक पिके घेणार?

उत्तर: काही वर्षांपूर्वी जवस हे विदर्भातील महत्त्वाचे पीक होते; परंतु अलीकडे हे पीक कमी झाले आहे. याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत असून, मसाले पिकातील ओवा, हळद पिकाकडे शेतकरी वळला आहे. तद्वतच रब्बी हंगामात ज्वारी व बाजरी इत्यादी पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. पीक प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून ‘आत्मा’ व ‘पोक्रा’ योजनेंतर्गतही पीक पेरणीकडे भर देण्यात आला आहे. म्हणूनच रब्बी ज्वारी २,५००, ओवा २,५००, जवस ५० आणि बाजरी ५० हेक्टरपर्यंत वाढली आहे.

प्रश्न: कीटकनाशक फवारणीसंदर्भात कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत?

उत्तर: गतवर्षीच्या खरीप हंगामात कीटकनाशके फवारणी करताना जिल्ह्यात ३७४ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली होती. त्यावेळी कृषी विभाग, महसूल, ग्रामविकास, आरोग्य व गृह विभाग, एकूणच जिल्हा प्रशासनाने एकत्रितरीत्या मोहीम राबवून विषबाधा झालेल्या सर्व रुग्णांचे प्राण वाचविण्यात आले. जिल्ह्यातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकाºयांना आंतरराष्टÑीय स्तरावरील डॉ. प्रजापती व डॉ. पिल्ले यांनी यासंदर्भात प्रशिक्षण व माहिती दिली. हे मॉडेल राज्य व राष्ट्रीय पातळीवर दिशादर्शक ठरेल, असे वाटते. फवारणी करताना घ्यावयाची काळजी, शास्त्रीय पद्धत आदींबाबत कृषी विभाग मार्गदर्शन करीतच आहे.

प्रश्न: नावीन्यपूर्ण उपक्रम कोणते राबविले?

उत्तर: राष्टÑीय सुरक्षा अभियानांतर्गत या रब्बी हंगामात २,२०० शेतकºयांना हरभरा १३,५०९ तर गहू पिकाचे ३,६४० क्ंिवटल प्रमाणित बियाणे परमिटवर वितरित करण्यात आले. याकरिता आत्माचे तालुका व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक तसेच ५१७ कृषी मित्रामार्फत ८ दिवसांत ही मोहीम राबविण्यात आली.

Web Title: Emphasis on unconventional crop production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.