लॉकडाऊनऐवजी लसीकरण व टेस्टिंगवर भर द्या - मदन भरगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:19 AM2021-04-07T04:19:21+5:302021-04-07T04:19:21+5:30

जिल्हयात १६जानेवारी २०२१ ला लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ३० टक्के लसीकरण पूर्ण होणे गरजेचे होते. ...

Emphasize vaccination and testing instead of lockdown - Madan Bhargad | लॉकडाऊनऐवजी लसीकरण व टेस्टिंगवर भर द्या - मदन भरगड

लॉकडाऊनऐवजी लसीकरण व टेस्टिंगवर भर द्या - मदन भरगड

Next

जिल्हयात १६जानेवारी २०२१ ला लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ३० टक्के लसीकरण पूर्ण होणे गरजेचे होते. जिल्ह्याची लोकसंख्या २० लाखांच्या आसपास आहे. त्यादृष्टीने निदान सहा ते सात लाख लोकांचे लसीकरण होणे आवश्यक होते. मात्र आतापर्यंत केवळ एक लाख सात हजार नागरिकांचे लसीकरण झाले जे फक्त ५ टक्केच आहे. त्यामुळे महापालिका व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारभारावर भरगड यांनी संताप व्यक्त केला.

शासनाने इतरत्र कोट्यवधी खर्च केले तसेच लॉकडाऊनमुळे तर सरकारचा कोट्यवधी रूपयाच्या महसुलाचे नुकसान होत आहे. त्याऐवजी दोन चार कोटी रुपये खर्च करून आणखी एक प्रयोगशाळा उभारुन कोरोनाची आर.टी.पीसीआर चाचण्याची क्षमता तीन ते चार हजार लोकांची करून दररोज कोरोना रुग्णांचे निदान करून उपचार करता आले असते व जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आणण्यात मदत झाली असती असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे प्रत्येकाला लसीकरण सक्तीचे करण्याचीही मागणी भरगड यांनी केली आहे. खासगीत २५० रुपये खर्च करून लसीकरण करण्याची अनेकांची तयारी आहे. त्यामुळे शासनावर फारसा ताण येणार नाही, असेही भरगड यांनी म्हटले आहे.

Web Title: Emphasize vaccination and testing instead of lockdown - Madan Bhargad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.