सस्ती येथे मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:20 AM2021-09-19T04:20:01+5:302021-09-19T04:20:01+5:30
याच रस्त्याने सर्व गावातील ग्रामस्थ ये-जा करत असून, या मार्गात घाण कचरा, सडलेले कांदे टाकलेले आहेत. या सर्व ...
याच रस्त्याने सर्व गावातील ग्रामस्थ ये-जा करत असून, या मार्गात घाण कचरा, सडलेले कांदे टाकलेले आहेत. या सर्व घाणीचा गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत सदस्य सुनील बंड यांनी ७ सप्टेंबर रोजी तक्रार दिली आहे. यावर ९ सप्टेंबर रोजी ग्रामसभेत त्यावर चर्चा करून लवकरच काही दिवसात घाणीचे व कचऱ्याची विल्लेवाट लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच संबंधित ग्रामस्थांना कचरा न टाकण्याच्या नोटीस देण्याचे सांगितले होते; परंतु १२ दिवस उलटूनही परिस्थिती कायम आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असून, कुठल्याही अर्जाचा त्यांच्यावर परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे.
वॉर्ड क्रमांक १ मधील गटाराबाबत महिन्याला अर्ज देऊन गटाराचे कुठल्याच प्रकारचे निर्मूलन व समस्या निकाली काढण्यात आली नाही. याकडे लक्ष देऊन कचरा काढून परिसर स्वच्छ करण्यात यावा.
- सुनील बंड, ग्रामपंचायत सदस्य
गावातील नागरिकांकडून आरोग्य कर वसूल करण्यात येते. त्यामुळे ग्रामपंचायतीने नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन गावातील साफसफाई करावी. जेणेकरून ग्रामस्थांचे आरोग्य सांभाळता येईल.
- जयंत अंभोरे, ग्रामस्थ
वार्ड क्रमांक ३ मधील कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली असून, मुख्य मार्गावर ग्रामस्थांनी घाण टाकू नये व पावसाळा संपताच रस्ता दुरुस्ती करण्यात येईल तसेच स्वच्छता ठेवण्यात येईल.
- संजय काशीद, उपसरपंच