जिल्हा परिषदेच्या गाड्यांच्या सुट्या भागांवर कर्मचाऱ्यांचा डोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 02:58 PM2019-02-22T14:58:21+5:302019-02-22T14:58:43+5:30
अकोला : जिल्हा परिषदेची वाहने वापरातून बाद करण्यापूर्वी त्यातील महागडे सुटे भाग स्वत:च्या वाहनासाठी वापरून हौस पूर्ण करण्याचा प्रकार भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या एचएच ३० ए २७६ या वाहनाबाबत घडला आहे.
अकोला : जिल्हा परिषदेची वाहने वापरातून बाद करण्यापूर्वी त्यातील महागडे सुटे भाग स्वत:च्या वाहनासाठी वापरून हौस पूर्ण करण्याचा प्रकार भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या एचएच ३० ए २७६ या वाहनाबाबत घडला आहे. एका कर्मचाºयाने या वाहनातील चारही टायर आणि इतर सुटे भाग आपल्या वाहनाला लावल्याची माहिती असून, त्याबाबत पाणी पुरवठा विभाग अनभिज्ञ आहे. चालक सेवानिवृत्त झाल्यानंतर ते वाहन नादुरुस्त असल्याचे दाखवून आता भांडारात ठेवण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात या वाहनासंदर्भात संपूर्ण माहिती नाही. ही बाब हेरून संबंधित कर्मचाºयाने या वाहनाच्या सुट्या भागावर डल्ला मारला. वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाकडून वाहन जिल्हा परिषदेच्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडे देण्यात आले. त्याची दुरुस्ती व देखभालीचा खर्च जिल्हा परिषदेकडे आहे; मात्र त्या वाहनाला वापरातून काढण्यापूर्वी अखेरचे टायर केव्हा लावण्यात आले, याची कोणतीच माहिती जिल्हा परिषदेत नाही. २०१२ मध्ये नवीन टायर खरेदी करून लावल्याचा जुजबी उल्लेख आहे. त्यापूर्वी २००८ मध्ये टायर बदलली. दरम्यान, पाणी पुरवठा विभागाने कंत्राटी तत्त्वावर नवी वाहने घेतली. त्यामुळे २०१७ अखेरपासून ते वाहन थांबलेले आहे. त्यानंतर जानेवारी २०१९ मध्ये वाहन चालक अत्तरदे निवृत्त झाले. त्यांनी निवृत्त होण्यापूर्वी ते वाहन वाशिम बायपास परिसरातील भांडारात नेऊन ठेवले. दरम्यानच्या काळात विभागातील एका कर्मचाºयाने वाहनाचे चारही टायर गायब केले. त्यातील महागडे सुटे भाग काढून घेतले. ते सर्व स्वत:च्या वाहनाला जोडल्याची माहिती आहे. याप्रकरणी खातरजमा केली. चालकालाही माहिती विचारण्यात आली. त्यावरच पाणी पुरवठा विभाग शांत बसला तसेच वाहन वापरातून काढण्याची फाइल तयार झाली आहे. विभागातील संबंधित कर्मचाºयाने चौर्यकर्म प्रकार कोणाच्या मूकसंमतीने केले, ही बाब आता शोधाची झाली आहे.