कर्मचा-यांचा आकृतिबंध नव्याने होणार !
By admin | Published: September 13, 2016 03:08 AM2016-09-13T03:08:20+5:302016-09-13T03:08:20+5:30
आयुक्तांच्या निर्देशानंतर अकोला महापालिकेचा सामान्य प्रशासन विभाग लागला कामाला.
आशीष गावंडे
अकोला, दि. १२: महापालिकेच्या बिंदूनामावलीला विभागीय आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिल्यामुळे प्रशासनाचा सरळ सेवा पदभरतीचा मार्ग मोकळा झाला होता. हद्दवाढीमुळे मनपा क्षेत्रात समाविष्ट झालेल्या तत्कालीन ग्रामपंचायतींमधील कर्मचार्यांना मनपाच्या आस्थापनेवर सामावून घ्यावे लागणार असल्याने आयुक्त अजय लहाने यांनी कर्मचार्यांचा सुधारित आकृतिबंध तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निर्देश संबंधित विभागाला दिले असून हा आकृतीबंध मंजुरीसाठी सादर केला जाईल.
मनपा प्रशासनाने २00४ पासून बिंदू नामावली अद्ययावत करण्याला ह्यखोह्ण दिला. ऑगस्ट २0१५ मध्ये अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एस. थूल यांनी प्रशासनाला बिंदूनामावली अद्ययावत करण्याचे निर्देश दिले होते. सप्टेंबर २0१५ मध्ये आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणार्या अजय लहाने यांनी सर्वप्रथम बिंदू नामावलीचा विषय हाती घेतला. अकरा वर्षांपासून बिंदू नामावलीचा विषय जाणीवपूर्वक थंड बस्त्यात ठेवल्याने तांत्रिक संवर्गातील रिक्त पदांसह विविध पदांचा अनुशेष निर्माण झाला.
परिणामी जलप्रदाय विभाग, बांधकाम विभाग, नगर रचना विभागाच्या माध्यमातून होणारी कामे प्रभावित झाली. घरकुल योजना असो वा विकासकामांची देखरेख, मानधनावरील कनिष्ठ अभियंत्यांवर कामाचा ताण पडत आहे. याशिवाय, नियमबाह्य पदोन्नतीद्वारे अनेक कर्मचार्यांनी महत्त्वाच्या पदांवर कब्जा केल्याने पदोन्नतीसाठी पात्र कर्मचार्यांवर अन्याय झाला. त्यामुळे अनेक कर्मचार्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. मनपाचा प्रशासकीय कारभार ताळ्य़ावर आणण्यासाठी बिंदूनामावली अद्ययावत करणे अत्यावश्यक असल्याचे लक्षात घेता, आयुक्त अजय लहाने यांनी बिंदूनामावलीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले होते. या विभागाने प्रस्ताव तयार करून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला होता. त्यावेळी सरळ सेवा पदभरतीच्या नामावलीला विभागीय आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिली. सद्यस्थितीत हद्दवाढीमुळे मनपाच्या आस्थापनेत बदल होणार आहेत. त्यामुळे मनपा क्षेत्रात समाविष्ट झालेल्या तत्कालीन ग्रामपंचायतींमध्ये आस्थापनेवर कार्यरत ६१ कर्मचार्यांना मनपाच्या आस्थापनेवर सामावून घेतले जाईल. याकरिता आयुक्तांनी मनपाचा सुधारित आकृतिबंध तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. आकृतिबंधाला शासनाने मंजुरी दिल्यानंतर बिंदूनामावलीनुसार पदोन्नती प्रक्रिया व सरळ सेवा पदभरती प्रक्रियेला सुरुवात केली जाईल.
मनपाने जानेवारी महिन्यात बिंदूनामावलीचा प्रस्ताव तयार करून विभागीय आयुक्तांकडे सादर केला असता, सरळ सेवा पदभरतीच्या नामावलीला विभागीय आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिली होती. तसेच पदोन्नती प्रक्रियेच्या बिंदू नामावली प्रस्तावाची छाननी सुरू केली होती. आयुक्तांच्या निर्णयामुळे पदोन्नती प्रक्रियेला आपसूकच ह्यब्रेकह्ण लागल्याचे दिसून येते.
*पदभरतीचा आयुक्तांनाच अधिकार
शासननिर्णयाप्रमाणे बिंदू नामावलीनुसार रिक्त पदे भरण्याचा अधिकार मनपा आयुक्तांना असून, आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन केले जाईल. त्यानंतर सरळ सेवा पदभरतीद्वारे तांत्रिक संवर्गातील पदे भरली जातील.
*मनपाचे कामकाज प्रभावित
जलप्रदाय विभाग, बांधकाम विभाग, नगररचना विभागातील तांत्रिक संवर्गातील पदे रिक्त असून उर्वरित मानसेवी कर्मचार्यांवर कामाचा ताण वाढला आहे. संबंधित विभागांची स्थिती ह्यएक ना धड भाराभर चिंध्याह्णअशी झाल्यामुळे आयुक्तांनी किमान तांत्रिक संवर्गातील पदांसाठी मानधन तत्त्वावर पदभरती करण्याची नितांत गरज आहे.