घरकुल लाभार्थींकडून कर्मचारी करतात आर्थिक मागणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:19 AM2021-05-06T04:19:58+5:302021-05-06T04:19:58+5:30
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव या सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या गावातील घरकुल लाभार्थ्यांकडून आर्थिक मागणी केली जात असल्याचा आरोप ...
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव या सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या गावातील घरकुल लाभार्थ्यांकडून आर्थिक मागणी केली जात असल्याचा आरोप सरपंच, ग्रामसचिवांसह ग्रामपंचायत सदस्यांनी ५ मे रोजी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.
वाडेगाव येथील घरकुल योजनेच्या संदर्भातील फाईल जमा केल्या असता, आजपर्यंत लाभार्थ्यांची ऑनलाईनमध्ये समाविष्ट करण्यात आली नाहीत. त्याचप्रमाणे वाडेगाव ग्रामपंचायतींतर्गत कार्यरत असलेल्या शाखा अभियंता, पंचायत समिती, बाळापूर यांनी बऱ्याच लाभार्थींकडून पैशांची मागणी केली आहे. तसेच रोजगार सेवकसुद्धा कामात टाळाटाळ करत आहेत. पंचायत समितीमध्ये घरकुल विभागात कार्यरत असणारे जितेंद्र इंगळे हे सुद्धा पैशाची मागणी करत आहेत व काम करण्यास नेहमी टाळाटाळ करत आहेत. संबंधितांवर कारवाई करून वाडेगाव येथील घरकुल लाभार्थ्यांना न्याय द्यावा, असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रार अर्जावर सरपंच मंगेश तायडे, ग्रामविकास अधिकारी डिवरे, उपसरपंच सुनील घाटोळ, ग्रामपंचायत सदस्य सुनील घाटोळ, मंदा सुनील मानकर, रुपाली अंकुश शहाणे, राजेश्वर अरुण पळसकर, कीर्ती सतीश सरप, मोहम्मद हनिफ, खैरुनिसा शेख चाँद, शेख मोईन शेख ख्वाजा, गजरावती अनुप इंगोले, अनिसाबी शेख फिरोज, शेख सलिम शेख रहूल्ला, मोहम्मद मुजाहिद गुलाम दस्तगीर, शीतल सदानंद मानकर, आदींच्या स्वाक्षरी आहेत.