कर्मचा-यांनी अकोला महापालिकेला दिली नोटीस

By admin | Published: December 4, 2014 01:41 AM2014-12-04T01:41:47+5:302014-12-04T01:41:47+5:30

सोमवारपासून संघर्ष समितीचे आंदोलन

Employees notice to Akola Municipal Corporation | कर्मचा-यांनी अकोला महापालिकेला दिली नोटीस

कर्मचा-यांनी अकोला महापालिकेला दिली नोटीस

Next

अकोला: सेवानवृत्त तसेच कार्यरत कर्मचार्‍यांच्या वेतनाची समस्या निकाली काढण्यास प्रशासन अपयशी ठरले असून, पाचव्या वेतन आयोगासह सहाव्या वेतन आयोगाची रक्कम थकीत आहे. मनपा कर्मचार्‍यांच्या अडचणी सोडविण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे नमूद करीत येत्या ८ डिसेंबरपासून आंदोलन छेडण्याचे महापालिका कर्मचारी व सेवानवृत्त कर्मचारी संघर्ष समितीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. तशी नोटीस समितीने प्रशासनाकडे बुधवारी सुपूर्द केली.
मनपा कर्मचार्‍यांच्या हिताकडे दुर्लक्ष करीत प्रशासन कामकाज करीत असल्याने कर्मचार्‍यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. सेवानवृत्त तसेच कार्यरत कर्मचार्‍यांचे वेतन थकीत असून, जुलै महिन्यापासून अद्यापही पगारवाढ लागू करण्यात आली नाही. कालबद्ध पदोन्नतीची वेतन श्रेणी लागू करून फरकाची रक्कम त्वरित देण्याची मागणी संघर्ष समितीने केली आहे. ८ डिसेंबरला मनपासमोर ताटवाटी वाजविण्याचे आंदोलन, १0 ते १२ डिसेंबरपर्यंत तीन दिवस काळ्य़ा फिती लावून कामकाज, २३ डिसेंबर रोजी मनपा कार्यालयावर मोर्चा तसेच आंदोलनाची दखल न घेतल्यास २३ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडणार असल्याचे संघर्ष समितीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
*कामकाज होणार प्रभावित
वरिष्ठ अधिकारी अपमानास्पद वागणूक देतात तसेच देय वेतनवाढ रोखण्यात आल्याचा आरोप करीत कर्मचारी संपाच्या मुद्यावर ठाम आहेत. यामुळे मनपाचे प्रशासकीय कामकाज प्रभावित होण्यासोबतच त्याचा परिणाम शहरातील पथदिवे, साफसफाई व पाणीपुरवठय़ावर होणार असल्याचे चिन्हं आहे.

Web Title: Employees notice to Akola Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.