कर्मचार्‍यांचे काम बंद; ‘महसूल’चे कामकाज ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:29 AM2017-10-11T01:29:25+5:302017-10-11T01:29:50+5:30

अकोला : विविध प्रलंबित मागण्या मंजूर करण्याच्या मागणीसाठी महसूल कर्मचार्‍यांनी ‘एल्गार’ पुकारत मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हय़ात महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे.

Employees' work is stopped; 'Revenue' workout jap! | कर्मचार्‍यांचे काम बंद; ‘महसूल’चे कामकाज ठप्प!

कर्मचार्‍यांचे काम बंद; ‘महसूल’चे कामकाज ठप्प!

Next
ठळक मुद्देकार्यालयांमध्ये शुकशुकाट! ३३८ कर्मचार्‍यांचा सहभाग!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विविध प्रलंबित मागण्या मंजूर करण्याच्या मागणीसाठी महसूल कर्मचार्‍यांनी ‘एल्गार’ पुकारत मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हय़ात महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे.
महसूल लिपिकाचे पदनाम बदलून महसूल सहायक असे करण्याचे मान्य करण्यात आले होते, त्यानुसार शासन निर्णय करण्यात यावा, नायब तहसीलदार पदाचा ‘ग्रेडपे’ ४८00 रुपये मान्य करण्यात आला होता. त्यासंदर्भात शासन निर्णय पारित करण्यात यावा, अव्वल कारकून संवर्गाच्या वेतनश्रेणीतील त्रुटी दूर करण्यात याव्या, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देण्याबाबत शासन निर्णय घेण्यात यावा, पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक संवर्गातील पदे पदोन्नतीची असल्याने पुरवठा निरीक्षकांची पदे सरळ सेवेतून भरण्यात येऊ नये, नायब तहसीलदार सरळसेवा भरती पदांचे प्रमाण ३३ टक्क्यांवरून २0 टक्के करण्यात यावे व पदोन्नतीने ८0 टक्के पदांचे प्रमाण मंजूर करण्यात आले.त्यानुसार शासन निर्णय पारित करण्यात यावा, आकृतिबंधात सुधारणा करण्याबाबत दांगट समितीने सादर केलेल्या प्रस्तावात लिपिक, अव्वल कारकून, नायब तहसीलदार व इतर पदे वाढविण्यात आली असून, त्यामध्ये कपात न करता तातडीने मंजुरी देण्यात यावी, यासह प्रलंबित दहा मागण्या मंजूर करण्याच्या मागणीसाठी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने बेमुदत काम बंद आंदेलन सुरू करण्यात आले आहे. काम बंद आंदोलनात जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय अंतर्गत अव्वल कारकून, कनिष्ठ लिपिक व शिपाई संवर्गातील महसूल कर्मचारी सहभागी झाल्याने जिल्हय़ात महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. या आंदोलनात महसूल कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिली. या आंदोलनात जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण इंगळे, सचिव राजेंद्र नेरकर, मंगेश पेशवे, नितीन निंबुळकर, वैजनाथ कोरकने, संतोष कुटे, सचिन भांबेरे, प्रशांत देशमुख, विशाल ढाकरगे, अविनाश डांगे, महेंद्र दामोदर, संदीप गावंडे, भूषण बोर्डे, योगेश खांदवे, प्रतीक जोशी, वर्षा भुजाडे, मेधा देशपांडे, उज्ज्वला सांगळे, वंदना वानखडे, रत्ना बाजारे, चारुशीला वाघमारे, अलका भांडे, शशिकांत फासे, नीलेश दामोदर, राहुल राठोड, शुभम यावलनकर, सतीश ढोले यांच्यासह जिल्हय़ातील महसूल कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: Employees' work is stopped; 'Revenue' workout jap!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.