मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला आडकाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 02:08 PM2017-09-28T14:08:28+5:302017-09-28T14:08:28+5:30
अकोला : रस्त्यावर अतिक्रमण थाटून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाºया अतिक्रमकांना हुसकावण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या कारवाईला आडकाठी निर्माण करीत कर्मचाºयांना धमक्या देणाºया अतिक्रमकांविरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांलगत दुकाने थाटणाºया लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होते. चारचाकी वाहने, दुचाकी वाहने उभी करण्यासाठी पार्किंगची सुविधा नसल्यामुळे समस्येत अधिकच भर पडली आहे. अतिक्रमणासंदर्भात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून थातूरमातूर कारवाई केली जाते. दुसºया दिवशी त्याच ठिकाणी अतिक्रमण कायम असल्याचे चित्र दिसून येते. अतिक्रमकांच्या मुजोरीमुळे खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉजपर्यंतच्या मार्गावरून अक्षरश: पायी चालणे अवघड होते. ही बाब लक्षात घेता अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र घनबहाद्दूर यांनी पथकातील कर्मचाºयांसह या मार्गावरील अतिक्रमकांना हुसकावण्याची कारवाई सुरू केली. यावेळी श्रीकृष्ण द्वारसमोर थेट रस्त्यावर दुकाने उभारणाºया मुक्तार फ्रुटवाले यांसह काही अतिक्र मकांनी कारवाईला अडथळा निर्माण करण्यासोबतच पथकातील कर्मचारी संजय थोरात, नरेश बोरकर, महेंद्र डिकाव, योगेश उंटवाल, धीरज गांगे, विजय पथरोट, रणजित तंबोली व इतर कर्मचाºयांना शिवीगाळ व दमदाटी केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र घनबहाद्दूर यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.