गुरुवारपासून शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:40 AM2021-09-02T04:40:13+5:302021-09-02T04:40:13+5:30
अकोला शहरामधील मुख्य रस्ते तसेच मुख्य बाजारपेठ येथे विविध व्यवसाय करणाऱ्या हॉकर्स व्दारे तसेच बाजारपेठ येथील बऱ्याच दुकानदारांव्दारे टीनशेड ...
अकोला शहरामधील मुख्य रस्ते तसेच मुख्य बाजारपेठ येथे विविध व्यवसाय करणाऱ्या हॉकर्स व्दारे तसेच बाजारपेठ येथील बऱ्याच दुकानदारांव्दारे टीनशेड टाकून करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना वाहतुकीसाठी खूप मोठ्या प्रमाणात अडचण हाेत आहे. त्यामुळे प्रशासनाव्दारे शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण धारकांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथील मैदान, भाटे क्लब येथील मैदान आणि जठार पेठ येथील भाजी बाजार येथे व्यवस्था करण्यात आली आहे.
साहित्य जप्तीसह दंडही हाेणार
शहरातील सर्व हॉकर्स यांनी आजपासून आपले व्यवसाय प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागेवरच करावे. अन्यथा गुरुवार २ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमे अंतर्गत अतिक्रमण धारकांचे साहित्य जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे प्रशासनाव्दारे कळविण्यात आले आहे.