अतिक्रमणाने वाहतुकीला खाेळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:19 AM2021-01-25T04:19:44+5:302021-01-25T04:19:44+5:30

जैविक कचरा रस्त्यावर अकाेला : शहरातील बहुतांश हाॅस्पिटलचा जैविक कचऱ्याची याेग्यरीत्या विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने हा जैविक कचरा रस्त्यावर ...

Encroachment obstructs traffic | अतिक्रमणाने वाहतुकीला खाेळंबा

अतिक्रमणाने वाहतुकीला खाेळंबा

Next

जैविक कचरा रस्त्यावर

अकाेला : शहरातील बहुतांश हाॅस्पिटलचा जैविक कचऱ्याची याेग्यरीत्या विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने हा जैविक कचरा रस्त्यावर असल्याचे चित्र आहे. रामनगर परिसरात हे प्रमाण प्रचंड असून, त्यामूळे नागरिक हैराण झाले आहेत.

बेशिस्त ऑटाेचा धुडगूस

अकाेला : शहरात बेशिस्त ऑटाेचालकांमुळे अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे. राेडवरून ऑटाे चालविताना पाठीमागून येणाऱ्या वाहनाचा विचार न करता प्रवासी दिसताच अचानक ब्रेक दाबून ऑटाे थांबविण्याचा प्रकार प्रचंड वाढत आहे. त्यामुळे अपघात हाेत आहेत.

श्वानांचा हैदाेस

अकाेला : माेठी उमरी रेल्वे पुलाजवळ श्वानांचा प्रचंड हैदाेस आहे. वाहनचालकांच्या अंगावर हे श्वान धावत असल्याने या ठिकाणी काही वाहनचालक वाहनावरून खाली काेसळल्याचे वास्तव आहे. मनपा प्रशासनाने या श्वानांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.

वाशिम बायपास चाैकात वाहतूक विस्कळीत

अकाेला : वाशिम बायपास चाैकात सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने या ठिकाणी वाहतूक जाम हाेत असल्याचे चित्र आहे. दिवसभरात दर तासाला वाहतूक जाम हाेत असल्याने माेठा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. या राेडची एक बाजू तयार करण्याची मागणी हाेत आहे.

शहरात अवैध बांधकामाचा सपाटा

अकाेला : शहरात सध्या काही माेठ्या उद्याेजक व बिल्डर्सकडून अवैध बांधकामाचा सपाटा सुरू करण्यात आला आहे. यावर मनपा प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.

Web Title: Encroachment obstructs traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.