काला चबुतरा, इंदौर गल्लीतील अतिक्रमणाचा सफाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 01:54 PM2019-07-03T13:54:11+5:302019-07-03T13:54:16+5:30
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सिटी कोतवाली ते जुना भाजी बाजार, तसेच काला चबुतरा बाजार व इंदौर गल्लीतील अतिक्रमणाचा सफाया केला.
अकोला: मुख्य बाजारपेठेत अतिक्रमणाच्या वाढत्या समस्येमुळे अकोलेकरांच्या नाकीनऊ आल्याची परिस्थिती आहे. वैतागलेल्या अकोलेकरांची समस्या लक्षात घेता मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सिटी कोतवाली ते जुना भाजी बाजार, तसेच काला चबुतरा बाजार व इंदौर गल्लीतील अतिक्रमणाचा सफाया केला. काला चबुतरा, इंदौर गल्लीत दुकानदारांनी बांधलेले पक्के ओटे, टिनाचे अतिक्रमित शेड, नाल्यांवरील धापे भुईसपाट करण्याची कारवाई अतिक्रमण निर्मूलन पथकाने केली.
शहरातील मुख्य बाजारपेठ व परिसराला लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांनी गराडा घातला आहे. मनपाच्या अतिक्र मण निर्मूलन पथकाचा धाक नसल्यामुळे फेरीवाले चक्क मुख्य रस्त्यांवर बाजार मांडत असल्याची परिस्थिती आहे. यामध्ये प्रामुख्याने रेडीमेड ड्रेस विक्रेते, खाद्यपदार्थांची विक्री करणारे तसेच फळ विके्रत्यांचा समावेश आहे. शहराची संपूर्ण बाजारपेठ गांधी रोड, टिळक रोड, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉजपर्यंतच्या मार्गावर स्थिरावली आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत कमर्शियल कॉम्प्लेक्समधील दुकाने, प्रतिष्ठानांच्या नाकावर टिच्चून लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांनी रस्त्यांलगत दुकाने थाटली आहेत. नागरिकांना रस्त्यावर धड पायी चालणे मुश्कील झाले आहे. यासंदर्भात मनपा प्रशासनासह सत्ताधाऱ्यांकडे असंख्य तक्रारी होत आहेत. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणाचा सफाया करण्याचा आदेश अतिक्रमण निर्मूलन पथकाला दिले असता मंगळवारी या विभागाने अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. ही कारवाई अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र घनबहादूर, प्रवीण मिश्रा यांच्यासह सुरक्षा रक्षक राज यादव, चेतन काशीकर, विशाल गवई, कृष्णा झा, जीवन मानकीकर, मोहम्मद इक्बाल, करण ठाकूर व उमेश भगत यांनी केली.
या ठिकाणी बाराही महिने अतिक्रमण
शहरातील मुख्य रस्त्यांवर थाटल्या जाणाºया अतिक्रमणामुळे सर्वसामान्य अकोलेकर त्रस्त आहेत. यामध्ये प्रामुख्याने गांधी चौक, गांधी चौपाटी, मनपाची आवारभिंत, जैन मंदिर परिसर, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉज परिसर, मोहम्मद अली मार्ग, ताजनापेठ चौक, टॉवर चौक व धिंग्रा चौकाचा समावेश आहे.