स्कूल बसच्या धडकेने चिमुकल्याचा अंत

By admin | Published: October 14, 2015 01:29 AM2015-10-14T01:29:38+5:302015-10-14T01:29:38+5:30

खंडाळा येथील घटना.

The end of pinch of school bus | स्कूल बसच्या धडकेने चिमुकल्याचा अंत

स्कूल बसच्या धडकेने चिमुकल्याचा अंत

Next

हिवरखेड (जि. अकोला): स्कूल बसच्या धडकेने चिमुकला ठार झाल्याची खंडाळा रोडवर मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. संघर्ष सुनील पोटोळे (४) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. आकोट येथील सेदाणी इंग्लिश स्कूलची एमएच ३0 एए ५५१९ या क्रमांकाची बस खंडाळा येथे मंगळवारी दुपारी विद्यार्थी पोहचविण्यासाठी गेली होती. प्राथमिक शाळेजवळ संघर्ष सुनील पाटोळे हा चिमुकला बसच्या मागच्या चाकाखाली सापडला. या अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी अडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून त्याला आकोट येथील ग्रामीण रुग्णालय हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला घोषित केले. पोलिसांनी स्कूल बसचा चालक शालीग्राम शिंगणे (३५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास ठाणेदार सुधाकर देशमुख करीत आहेत.

Web Title: The end of pinch of school bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.