पश्चिम वऱ्हाडात २०० ठिकाणी ऊर्जा बचत, परीक्षण कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 06:27 PM2018-10-31T18:27:45+5:302018-10-31T18:27:54+5:30
अकोला : शासकीय कार्यालय, औद्योगिक क्षेत्र तसेच शाळा-महाविद्यालयांसारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये विजेचा वाढलेला भरमसाट वापर कमी करण्यासाठी ऊर्जा बचत कार्यक्रम आणि प्राथमिक ऊर्जा परीक्षण योजना पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यांमधील २०० ठिकाणांवर राबविण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
- सचिन राऊत
अकोला : शासकीय कार्यालय, औद्योगिक क्षेत्र तसेच शाळा-महाविद्यालयांसारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये विजेचा वाढलेला भरमसाट वापर कमी करण्यासाठी ऊर्जा बचत कार्यक्रम आणि प्राथमिक ऊर्जा परीक्षण योजना पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यांमधील २०० ठिकाणांवर राबविण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यामध्ये ऊर्जा बचत योजना ४५ आस्थापनांमध्ये राबविण्यात येणार असून, प्राथमिक ऊर्जा परीक्षण योजना १५० आस्थापनांमध्ये राबविण्यात येणार आहे.
अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांमध्ये ऊर्जा बचत कार्यक्रम आणि प्राथमिक ऊर्जा परीक्षण योजना (एनर्जी आॅडिट एनर्जी सेव्ह प्रोग्राम) राबविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. यामध्ये अकोला महापालिकेला २५ लाख रुपयांचा धनादेश देऊन या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतर तीन जिल्ह्यांतील शासकीय कार्यालय, औद्योगिक संस्था, निमशासकीय कार्यालय, मोठे खासगी उद्योग या ठिकाणावर ऊर्जा बचत कार्यक्रम आणि प्राथमिक ऊर्जा परीक्षण योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे तब्बल ३० टक्के विजेचा वापर कमी होणार असल्याची माहिती आहे.
नोंदणीकृत संस्थेकडून आॅडिट
ऊर्जा बचत कार्यक्रम आणि प्राथमिक ऊर्जा परीक्षण योजनेचे आॅडिट मुंबई येथील नोंदणीकृत असलेली एआरएस एनर्जी आॅडिटर्स यांच्याकडून करण्यात येणार आहे. या योजनेचे तीन जिल्ह्यांतील शासकीय कामकाज विभागीय व्यवस्थापक विनोद एस. शिरसाट यांच्या निदर्शनात प्रदीप ऊर्फ राजू फाटे यांच्या ओम नम:शिवाय इलेक्ट्रिकल्सकडून पाहण्यात येणार आहे. यासाठीचा करार करण्यात आला. केवळ ऊर्जा वाचविण्यासाठी अत्यंत माफक दरात हे कामकाज पाहण्यात येणार आहे.
ऊर्जा बचत कार्यक्रम आणि प्राथमिक ऊर्जा परीक्षण योजना कार्यान्वित क रण्यात आली आहे. यासाठी शासकीय कार्यालय, औद्योगिक क्षेत्रातील कार्यालय आणि खासगी संस्थांनी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभीकरणच्या विभागीय कार्यालयाशी संपकर् साधावा. ‘प्रथम अर्ज-प्रथम लाभ’ याप्रमाणे लाभार्थींना लाभ मिळणार आहे. या योजनेमुळे ३० टक्के विजेचा वापर कमी होऊन वीज बचत होणार आहे.
- जयप्रकाश गारमोडे, व्यवस्थापक, महाऊर्जा अकोला.