संचारबंदीची सक्तीने अंमलबजावणी करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:20 AM2021-02-24T04:20:52+5:302021-02-24T04:20:52+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील कारोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, ...
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील कारोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, प्रभारी मनपा आयुक्त पंकज जावळेकर, जिल्हा शल्य चिकीत्सक राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. नितीन आंभोरे, दिनेश नैताम, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, मनपाचे वैद्यकीय अधिकारी फारुख शेख, आदि उपस्थित होते.
नागरिकांनी मास्कचा वापर, फिजीकल डिस्टन्सिंग व हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीय नियमाचे पालन करुन, जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. प्रतिबंधात्मक क्षेत्रातील ज्या भागात रुग्ण संख्या जास्त आहे त्या भागात संपर्कातील व्यक्तीचा शोध घेवून चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे सांगत होम आसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांच्या हातावर शिक्के मारुन, असे रुग्ण घराबाहेर आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी पोलिस विभागाने विशेष पथक तयार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या.