आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Published: April 28, 2017 02:04 AM2017-04-28T02:04:36+5:302017-04-28T02:04:36+5:30
खेट्री : नजीकच्या गावंडगाव येथील महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चान्नी पोलिसांनी २६ एप्रिल रोजी मृतक महिलेच्या पतीसह सासरच्या एकूण चौघे जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
खेट्री : नजीकच्या गावंडगाव येथील महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चान्नी पोलिसांनी २६ एप्रिल रोजी मृतक महिलेच्या पतीसह सासरच्या एकूण चौघे जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गावंडगाव येथील मेनका संजय राठोड (२६) ही १७ एप्रिल रोजीच्या रात्री १० वाजता घराजवळ विहिरीवर पाणी आणण्यासाठी जात आहे, असे सांगून गेली होती. ती रात्री उशिरापर्यंत घरी न पोहोचल्याने पतीसह घरातील इतर लोकांनी तिचा गावात शोध घेतला असता मृतदेह विहिरीत आढळून आला. त्यावेळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर मृतक महिलेचे वडील रामेश्वर सावजी जाधव रा. शिर्ला नेमाने ता. खामगाव यांनी तिच्या पतीसह सासरच्या लोकांनी शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार चान्नी पोलिसांत नोंदविली. सदर तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी मेनकाचा पती संजय राठोड, नणंद शोभा राठोड, नंदोई बंडू पवार व सिंधु पवार, या चौघे जणांविरुद्ध भांदविच्या ४९८ (अ), ३०६, ३४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चान्नी पोलीस करीत आहेत.