बालकाच्या मृत्यूप्रकरणी महावितरण अभियंता निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 02:01 PM2019-11-13T14:01:20+5:302019-11-13T14:01:28+5:30
जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने ८ नोव्हेंबर रोजी त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला व महेबूब शाह हे गंभीर जखमी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर: तालुक्यातील नवसाळ येथे रहिवासी साहील शहा अय्युब शाह हा गावातील महेबूब शाह यांच्या सोबत बकऱ्या चारण्यासाठी गेला होता. बकºया चारत असताना बालकाचा लोंबकळलेल्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने ८ नोव्हेंबर रोजी त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला व महेबूब शाह हे गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी माना पोलिसांनी अभियंता खंडारे व लाइनमन विजय बनसोड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, विजय बनसोड याला पोलिसांनी अटक केली असून, घटनेला जबाबदार असलेला अभियंता फरार झाला आहे. या प्रकरणी शाखा अभियंता खंडारे व वायरमन विजय बनसोड यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. नवसाळ येथील साहील शाह अय्यूब शाह हा १५ वर्षीय बालक गावातील मेहबूब शाह या वृद्धासोबत बकºया चारण्यासाठी रानात गेला होता. दृष्टीस न पडलेल्या ११ केव्हीच्या विद्युत पोलच्या लोंबकळलेल्या ताराला स्पर्श झाल्याने साहील हा जागीच गतप्राण झाला व ७० वर्षीय महेबूब शाह गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी माना पोलिसात जामठी सर्कलचे शाखा अभियंता खंडारे व वायरमन विजय बनसोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनाक्रम लक्षात घेता जखमींना न्याय मिळावा म्हणून महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाकडे वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने सोमवारी निवेदन सादर करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. तथापि, ९ नोव्हेंबर रोजी शाखा अभियंता खंडारे व वायरमन विजय बनसोड यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून, या प्रकरणातील दोन्ही फरार आरोपीपैकी वायरमन विजय बनसोड याला माना पोलिसांनी ११ नोव्हेंबर अटक केली आहे. सदर घटनेतील मुख्य आरोपी अद्यापही फरार असून आरोपीचे मोबाइल ट्रेस करणे सुरू असून, सध्या शिमला येथे लोकेशन मिळत असल्याचे माहिती आहे. या प्रकरणातील महावितरणच्या दोषी अधिकाºयाला अटक करण्यात यावी म्हणून वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)