प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील अभियंत्याने आधी घेतला लाभ, नंतर केली परीक्षा उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:54 PM2018-12-05T12:54:32+5:302018-12-05T12:54:40+5:30

वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ पाच वर्ष आधीच घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशात खोडतोड करण्याचा प्रताप प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत कार्यरत शाखा अभियंत्याने केला आहे.

engineer of the pradhanmantri gram sadak yojna make fool authority | प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील अभियंत्याने आधी घेतला लाभ, नंतर केली परीक्षा उत्तीर्ण

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील अभियंत्याने आधी घेतला लाभ, नंतर केली परीक्षा उत्तीर्ण

Next

अकोला: सेवेत दाखल झाल्यापासून पाच वर्षांच्या आत व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होण्याचा नियम आहे. ती परीक्षा उत्तीर्ण न होताच आश्वासित प्रगती योजनेतून वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ पाच वर्ष आधीच घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशात खोडतोड करण्याचा प्रताप प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत कार्यरत शाखा अभियंत्याने केला आहे. याप्रकरणी शासनाकडून अतिरिक्त वेतन तसेच इतरही आर्थिक लाभ उकळत फसवणूक करण्यात आली आहे. ती रक्कम वसूल करून कारवाई करण्याची मागणी पी.एम. आडे यांनी तक्रारीत केली आहे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत कार्यरत कनिष्ठ अभियंता ए.बी. पाचपोर यांनी व्यावसायिक परीक्षा २००५ मध्ये उत्तीर्ण केली. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी म्हणजे, वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या २३ आॅक्टोबर २००७ रोजीच्या आदेशात खोडतोड करून १ आॅगस्ट २००१ असा बदल करण्यात आला. त्यामुळे त्यांना २००१ पासून वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ सुरू झाला. मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या आदेशात हस्ताक्षरात नमूद केलेली दिनांक स्पष्ट असतानाही त्यांना लाभ देण्यात आला. त्यामध्ये संबंधितांनी संगनमताने हा प्रकार केला आहे. पाचपोर २००६ ते २००९ या काळात पातूर पंचायत समितीमध्ये कार्यरत होते. हे विशेष. नाशिक येथील अभियांत्रिकी अधिकारी महाविद्यालयाने जानेवारी २००५ मध्ये घेतलेल्या परीक्षेत पाचपोर उत्तीर्ण झाले. त्यांना २००१ पासून वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ कसा मिळाला, याची चौकशी करून संबंधितांवर करावी, शासनाकडून उकळलेले अतिरिक्त वेतन, आर्थिक लाभाची रक्कम वसूल करण्याची मागणीही आडे यांनी तक्रारीत केली आहे.

 

Web Title: engineer of the pradhanmantri gram sadak yojna make fool authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.