‘आरटीई’ नोंदणीची इंग्रजी माध्यमांच्या शाळांना प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 01:06 PM2019-02-15T13:06:41+5:302019-02-15T13:06:57+5:30

जिल्ह्यातील इंग्रजी शाळांना आरटीई नोंदणीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. इतर जिल्ह्यांमध्ये ८ ते २२ फेब्रुवारीदरम्यान नोंदणीची मुदत दिली आहे.

English medium schools waiting for 'RTE' registration! | ‘आरटीई’ नोंदणीची इंग्रजी माध्यमांच्या शाळांना प्रतीक्षा!

‘आरटीई’ नोंदणीची इंग्रजी माध्यमांच्या शाळांना प्रतीक्षा!

googlenewsNext


अकोला: शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्ह्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर वंचित व दुर्बल घटकातील मुलांना मोफत प्रवेश देण्यात येतो. त्यासाठी शिक्षण विभागाकडून आरटीई नोंदणी करण्यासाठी इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांना १० दिवसांचा कालावधी देण्यात येतो. २५ फेब्रुवारीपासून आॅनलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील इंग्रजी शाळांना आरटीई नोंदणीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. इतर जिल्ह्यांमध्ये ८ ते २२ फेब्रुवारीदरम्यान नोंदणीची मुदत दिली आहे.
२५ टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या पात्र शाळांना ‘आरटीई’अंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक आहे. २५ टक्के जागा राखीव ठेवण्यासाठी प्रवेश स्तर ठरविणे गरजेचे आहे. आॅनलाइन प्रक्रियेत शाळेने केलेल्या नोंदणीची पडताळणी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. ज्या शाळा २५ टक्के प्रवेशासाठी पात्र आहेत; परंतु त्या नोंदणी करीत नाही किंवा प्रवेश स्तरावरील एकूण क्षमतेच्या २५ टक्के राखीव जागा उपलब्ध करून देत नाहीत, अशा शाळांवर कायदेशीर कारवाई करून मान्यता रद्द करण्याचे अधिकार शिक्षणाधिकाºयांना आहेत. त्यामुळे आॅनलाइन प्रक्रियेमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेतात. गतवर्षी जिल्ह्यात २0८ शाळांनी ‘आरटीई’अंतर्गत नोंदणी केली होती. यंदासुद्धा शाळांना नोंदणीची प्रतीक्षा आहे; परंतु शालेय शिक्षण विभागाने अद्याप जिल्ह्यातील शाळांना नोंदणीसाठी मुदत दिली नाही. लगतच्या अमरावती, बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये शाळांना नोंदणीसाठी ८ ते २२ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. २५ फेब्रुवारीपासून आॅनलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार असल्यामुळे शिक्षण विभागाने निश्चित कालावधी दिल्यास, त्या कालावधीत शाळांना नोंदणी करणे सोयीस्कर जाईल. (प्रतिनिधी)
गतवर्षी नोंदणी झालेल्या शाळा
२0८
एकूण राखीव जागा
२४८८
झालेले प्रवेश
१९५२

 

Web Title: English medium schools waiting for 'RTE' registration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.