करमणूक कर वसुलीत घट
By admin | Published: November 6, 2014 12:42 AM2014-11-06T00:42:24+5:302014-11-06T00:42:24+5:30
अकोला जिल्ह्यात सहा महिन्यात १ कोटी ७0 लाखांची वसुली.
अकोला: यावर्षी सप्टेंबर अखेरपर्यंंत जिल्ह्यात १ कोटी ७0 लाख ७७ हजार रुपयांचा करमणूक कर वसूल करण्यात आला आहे. गतवर्षी सप्टेंबर अखेरपर्यंंत वसूल करण्यात आलेल्या करमणूक कराच्या तुलनेत यावर्षी ८ लाख ५0 हजार रुपये कमी कर वसुली करण्यात आल्याने, जिल्हा प्रशासनामार्फत यावर्षी वसूल करण्यात आलेल्या करमणूक कर वसुलीत घट झाली आहे.
सन २0१३-१४ या वर्षांंत सप्टेंबर अखेरपर्यंंत जिल्ह्यातील चित्रपटगृहे, व्हिडीओ सिनेमा, केबल जोडण्या, डीटीएच, व्हिडीओ गेम, डीव्हीडी गेम इत्यादी करणूक करापोटी जिल्हा करमणूक विभागामार्फत १ कोटी ७९ लाख २७ हजार रुपयांची वसुली करण्यात आली होती. सन २0१४-१५ या वर्षी मात्र गत १ एप्रिल ते ३0 सप्टेंबर अखेर या सहा महिन्यांच्या कालावधीत १ कोटी ७0 लाख ७७ हजार रुपये करमणूक कर वसूल करण्यात आला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सप्टेंबर अखेरपर्यंंत जिल्हा करमणूक कर विभागामार्फत वसूल करण्यात आलेला करमणूक कर ८ लाख ५0 रुपयांनी कमी आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात करमणूक कर वसुलीच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील करमणूक कर वसुलीबाबत यावर्षी ठरविण्यात आलेले ४ कोटी ६0 लाख करमणूक कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे सहाय्यक करमणूक कर अधिकारी जी.जी.गिरी यांनी सांगीतले.