अकोला शहरातील दहा मार्गांवर जड वाहतुकीस प्रवेशबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 05:42 PM2017-11-11T17:42:51+5:302017-11-11T17:46:38+5:30
अकोला - शहरातील बेताल वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या आदेशानंतर वाहतुक शाखेने शहरातील १० मार्गांवर सकाळी ७ तक ११ वाजेपर्यंत जड वाहनास बंदी घालण्यात आली आहे.
- सचिन राऊत
अकोला - शहरातील बेताल वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या आदेशानंतर वाहतुक शाखेने शहरातील १० मार्गांवर सकाळी ७ तक ११ वाजेपर्यंत जड वाहनास बंदी घालण्यात आली आहे. ४ नोव्हेंबर ते ३ फेब्रुवारी २०१८ पर्यंत या जड वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे.
जड वाहन व मालवाहू वाहनांमूळे शहरातील वाहतुकीला प्रचंड त्रास होत असून अपघातांचे प्रमाण वाढत आहे. जड वाहनांमूळे झालेल्या अपघातात एका विद्यार्थीनीसह, वृध्द व महिला तसेच एका चिमुकल्याला दोन वर्षांपूर्वी प्राणास मुकावे लागले. शहरातील बेताल वाहतुकीमूळे चार ते पाच जनांचा बळी गेल्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी शहरात १० मार्गांवर सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जड वाहनांना बंदी घातली होती, त्यानंतर आता याच आदेशाला कायम ठेवत पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी जड वाहतुकीस प्रवेशबंदी केली आहे. महाराष्ट्र पोलीस अधीनीयम १९५१ च्या कलम ३३ व ३६ नुसार प्राप्त अधिकार वापरुन जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील १० मार्गावर ये-जा करणाºया वाहतुकीचा समावेश असून जिल्हयासह बाहेरुन येणाºया जड वाहन चालकांनी या आदेशाचे पालन करण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रवेश बंदी केलेली मार्ग
सिटी कोतवाली चौक ते आकोट स्टॅन्ड
दगडीपुल ते माळीपुरा चौक ते बियाणी चौक
अकोट स्टॅन्ड ते अग्रसेन चौक
अग्रसेन चौक ते बाजारपेठ
टॉवर चौक ते फतेह चौक
रेल्वे स्टेशन मालधक्का ते दामले चौक
बाळापुरा नाक्यावरुन शहरात येणारी जड वाहने
वाशिम बायपासकडून शहरात येणारी वाहने
डाबकी रोड रेल्वे गेटकडून शहरात येणारी वाहने
शहरातील बेताल वाहतुक व्यवस्था सुधारण्यासाठी वाहतुक शाखेकडून युध्दस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे, मात्र त्यानंतरही काही वाहने प्रवेश करीत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणूण जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सोबतच सिग्णल व्यवस्थेतील तांत्रीक अडचणी दुर करून प्रत्येक चौकातील सिग्णल सुरु करण्यात येत आहेत.
- विलास पाटील, प्रमूख, वाहतुक शाखा, अकोला.