उद्यमशील ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक - गौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:17 AM2021-03-21T04:17:59+5:302021-03-21T04:17:59+5:30

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे अकोला कृषी विद्यापीठाला मंजूर सेंटर ऑफ एक्सलन्सच्या प्रभावी उपयोगीतेसंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा बैठक पार पडली. ...

Entrepreneurial rural economy requires effective use of information technology - Gaur | उद्यमशील ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक - गौर

उद्यमशील ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक - गौर

Next

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे अकोला कृषी विद्यापीठाला मंजूर सेंटर ऑफ एक्सलन्सच्या प्रभावी उपयोगीतेसंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा बैठक पार पडली. प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. ग्रामीण भागाचे सक्षमीकरणासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे शेतकरी, तंत्रज्ञानात पारंगत विद्यापीठे तथा इतर सहकार्यासाठी राज्य सरकारे आणि केंद्र सरकार यांच्यातील समन्वय अधिक दृढ होणे काळाची गरज असल्याचे मत सुद्धा गौर यांनी व्यक्त केले. तर विद्यापीठाद्वारे कृषी आणि तत्सम क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधनाच्या विविधांगी उपक्रमांतर्गत अनेक उपक्रम सुरू आहे. ग्रामीण भागातील युवा संशोधक उद्योजकांना याचा फायदा होत असून या माहिती तंत्रज्ञान केंद्राचे माध्यमातून एकात्मिक प्रयत्न मोट बांधत केंद्राची फलश्रुती दृष्टीपथात आणू असा आत्मविश्वास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केला.

या सभेसाठी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी ऑफ इंडियाचे महानिदेशक संजय कुमार गुप्ता, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे विशेष कार्य अधिकारी अमित गोळे, आयो केअर पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे उमेश मालू, सुबोध गर्ग यांचेसह विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, प्रकल्प प्रमुख डॉ.सुचिता गुप्ता, प्रा. नितीन गुप्ता, डॉ. मृदुलता देशमुख, कृषी विज्ञान केंद्र अकोलाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. उमेश ठाकरे विशेषत्वाने उपस्थित होते.

Web Title: Entrepreneurial rural economy requires effective use of information technology - Gaur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.