तर उद्योजक देशोधडीला लागतील!

By admin | Published: May 6, 2016 02:21 AM2016-05-06T02:21:25+5:302016-05-06T02:21:25+5:30

औद्योगिक महामंडळाचा नियोजनशून्य कारभार: मोठे उद्योजक अनुत्सुक.

The entrepreneurs will be desolated! | तर उद्योजक देशोधडीला लागतील!

तर उद्योजक देशोधडीला लागतील!

Next

राम देशपांडे /अकोला
दरवर्षी निर्माण होणार्‍या आवर्षणाच्या स्थितीवर मात करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाने कुठल्याच कायमस्वरूपी उपाययोजना केलेल्या नाहीत. नियोजनशून्य कारभारामुळे अकोल्याच्या औद्योगिक परिसरातील अर्धेअधिक उद्योग बंद पडले असून, तग धरून असलेले उर्वरित उद्योग पाण्याअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मोठय़ा प्रमाणात भागभांडवल गुंतविलेले उद्योजक देशोधडीला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर मोठे उद्योग या भागात येण्यास अनुत्सुक असल्याचे मत अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष कैलास खंडेलवाल व उपाध्यक्ष उन्मेष मालू यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना व्यक्त केले.
अकोल्याच्या औद्योगिक परिसरातील १ हजार १७५ उद्योगांपैकी ५९२ उद्योग गतकाळात पाण्याअभावी बंद पडले आहेत. दिवसाला किमान १५ हजार लिटर पाण्याची मागणी असलेल्या उर्वरित ६00 उद्योगांचा पाणीपुरवठा ७ हजार ५00 लिटरवर येऊन ठेपला असताना, औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थानिक अधिकार्‍यांनी अधिग्रहित विहिरींवर लक्ष केंद्रित करण्यास प्रारंभ केला आहे. नियोजनशून्य अधिकार्‍यांनी तहान लागल्यावर विहीर खणण्याचा प्रकार आरंभला असल्याचा घणाघाती आरोप ह्यलोकमतह्णशी बोलताना अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी केला. या विषयावर अधिक बोलताना ते म्हणाले की, आजतागायत अनेकदा अशी परिस्थिती अनेकदा निर्माण झाली; मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास औद्योगिक विकास महामंडळ असर्मथ ठरले आहे. महान धरणातील पाणी खांबोरा प्रकल्पात घेऊन ते उद्योगांना पुरविले जात होते; मात्र महान धरणातील पाणीसाठा आरक्षित करून थेट पाइप लाइनद्वारे तो एमआयडीला देता आला असता. ज्याप्रमाणे ७0 कि.मी. लांब असलेल्या अप्पर वर्धा धरणातून अमरावतीला पाणीपुरवठा केला जातो, त्याचप्रमाणे वान प्रकल्पातील पाणी थेट पाइप लाइनद्वारे अकोल्यापर्यंत आणता आले असते. हे अंतर ७0 कि.मी. पेक्षाही कमी आहे. 

Web Title: The entrepreneurs will be desolated!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.