उद्योजकता विकास, पशू आरोग्य तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:18 AM2021-02-12T04:18:12+5:302021-02-12T04:18:12+5:30
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच अनिल राठोड यांच्या हस्ते झाले. शिबिराचे समन्वयक डाॅ. प्रवीण बनकर यांनी दूध व्यवसायात अधिक नफा ...
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच अनिल राठोड यांच्या हस्ते झाले. शिबिराचे समन्वयक डाॅ. प्रवीण बनकर यांनी दूध व्यवसायात अधिक नफा मिळवण्यासाठी उद्योजकता कशी महत्त्वाची ठरते हे सांगितले. मार्गदर्शक म्हणून लाभलेले डाॅ. श्याम देशमुख आणि डाॅ. कुलदीप देशपांडे यांनी अनुक्रमे प्रजनन व्यवस्थापन व चारा व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. शिबिरास एकूण ५५ ग्रामस्थ उपस्थित होते.
पशू आरोग्य शिबिरात डाॅ. श्याम देशमुख यांनी ३० पेक्षा अधिक जनावरांवर वंध्यत्व निवारणासंबंधी उपचार केले. डाॅ. रविकुमार हातझाडे, डाॅ. सतीश मुंडे यांनी ४५ पेक्षा अधिक जनावरांवर औषधोपचार केले. डाॅ. स्नेहल पाटील, अनिल तायडे व त्यांच्या चमूचे विशेष सहकार्य लाभले.
शिबिरादरम्यान उपस्थितांना अभ्यास साहित्य, प्रमाणपत्र तसेच औषधे यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय इंगळे, सुरेंद्र इंगळे, अतुल पट्टेबहादूर, प्रकाश उपर्वट यांनी परिश्रम घेतले.