अकोला शहरात सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत जडवाहनांना प्रवेशबंदी
By रवी दामोदर | Published: June 19, 2023 06:08 PM2023-06-19T18:08:58+5:302023-06-19T18:09:21+5:30
अकोला शहरातील मार्गावर जड वाहनांना वाहतुकीकरीता रात्री १० वाजेपासून सकाळी ८ वाजेपर्यंत मोकळीक देऊन, जड वाहनांचे वाहतुकीकरीता शहरातील मार्गावर सकाळी ८ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत पुर्णपणे प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
अकोला : शहरातील जड वाहन, प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसेस यांना पोलीस विभागाव्दारे निश्चित केलेल्या मार्गावर प्रवेश बंदी तसेच प्रवेश बंदी शिथील करण्यासंबंधी प्रस्तावित केले आहे. त्याअनुषंगाने अकोला महानगराच्या बाहेरुन येणारे तसेच शहरअंतर्गत मार्गावरील जड वाहन, प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसेस यांना सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच जिवनावश्यक/अत्यावश्यक वस्तुची वाहतूक करणाऱ्या जड वाहनांना दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत शिथीलता देण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.'
अकोला शहरातील मार्गावर जड वाहनांना वाहतुकीकरीता रात्री १० वाजेपासून सकाळी ८ वाजेपर्यंत मोकळीक देऊन, जड वाहनांचे वाहतुकीकरीता शहरातील मार्गावर सकाळी ८ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत पुर्णपणे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. निवडक मार्गावर शहरात जिवनावश्यक/अत्यावश्यक वस्तुची वाहतूक करणाऱ्या जड वाहनांना दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत शिथीलता देण्याची तसेच शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसेस यांना प्रवासी चढ-उतार करण्याकरीता निश्चित केलेल्या मार्गाचे वापर करण्याचे पोलीस विभागाने प्रस्तावित केले आहे.