एसटीच्या सरळ सेवा भरती पोर्टलवर ‘एरर’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 04:05 AM2019-01-21T04:05:05+5:302019-01-21T04:05:11+5:30

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकाच्या सरळ सेवा भरती पोर्टलवर तीन दिवसांपासून ‘एरर’ येत आहे.

'Error' on ST bus service portal | एसटीच्या सरळ सेवा भरती पोर्टलवर ‘एरर’

एसटीच्या सरळ सेवा भरती पोर्टलवर ‘एरर’

Next

- संजय खांडेकर 
अकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकाच्या सरळ सेवा भरती पोर्टलवर तीन दिवसांपासून ‘एरर’ येत आहे. पोर्टलवर अर्ज स्वीकारले जात नसल्याने उमेदवारांचा हिरमोड होत आहे.
नोकर भरतीच्या आॅनलाइन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत देवनागरी लिपी कंपोज करण्याची अट आहे; मात्र देवनागरी लिपी कंपोज होत नसून, ४०१ एक्सेस डीनाय असा संदेश देत उमेदवारांचा अर्ज फेटाळला जात आहे. महामंडळात चालक आणि वाहकच्या ४,४१६ पदांची सरळ सेवा भरती होत आहे. ८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारण्याची मुदत आहे. एमएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांच्याशी संपर्क साधला; मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

Web Title: 'Error' on ST bus service portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.