सौंदळा येथे कोरोनाचा उद्रेक; नागरिकांमध्ये भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:16 AM2021-05-17T04:16:47+5:302021-05-17T04:16:47+5:30
सौंदळा: दानापूर आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या सौंदळा येथे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. सद्यस्थितीत आतापर्यंत गावातील कोरोनाबाधितांची संख्या ...
सौंदळा: दानापूर आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या सौंदळा येथे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. सद्यस्थितीत आतापर्यंत गावातील कोरोनाबाधितांची संख्या १८ वर पोहोचली असून, दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जिल्ह्यासह ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक सुरू असून, कोरोनाचा आकडा वाढत चालला आहे. सौंदळा येथे उपकेंद्र आहे; मात्र आरोग्य उपकेंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र कडक संचारबंदी करण्यात आली आहे ; मात्र नागरिक बेफिकीर असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरावे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून शासनास सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
--------------------
ढगाळ वातावरणाने व्हायरल फ्ल्यू चे रुग्ण वाढले !
गत दोन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण असल्याने सर्दी, ताप आजाराचे रुग्ण वाढले आहेत. कोरोनाच्या भीतीने रुग्ण अंगावर दुखणे काढत असल्याचे चित्र आहे. परिसरात व्हायरल फ्ल्यू ची साथ वाढल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.