अटक टाळण्यासाठी पुलावरून उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 01:31 AM2017-07-22T01:31:47+5:302017-07-22T01:31:47+5:30

११ बैलांना जीवनदान : विशेष पथकाची कारवाई; आरोपी जखमी

To escape from arrest, jump from the bridge | अटक टाळण्यासाठी पुलावरून उडी

अटक टाळण्यासाठी पुलावरून उडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावरून अमरावतीकडून एका वाहनातून ११ बैलांना अक्षरश: कोंबून कत्तलीसाठी अकोलाकडे नेणाऱ्या एका मालवाहू वाहनास बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीतील काटेपूर्णा बस थांब्यानजीक जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या विशेष पथकाने अडवले असता, त्या वाहनाच्या चालकाने अटक टाळण्यासाठी तेथील पुलावरून खाली उडी घेतल्याची घटना २१ जुलैच्या सकाळी घडली. यामुळे सदर आरोपी गंभीर जखमी झाला. सदर विशेष पथकाने ११ बैलांना जीवनदान देऊन सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..
काही आरोपी राष्ट्रीय महामार्गावरून अमरावतीहून अकोलाकडे एका मालवाहू वाहनातून काही बैलांना कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळासपुरे यांना शुक्रवारी सकाळी मिळाली. त्यामुळे त्यांनी काटेपूर्णानजीक एमएच ३० एबी २०९९ क्रमांकाच्या मालवाहू वाहनास थांबविले असता, त्यामध्ये ११ बैलांना हातपाय बांधलेल्या स्थितीमध्ये निर्दयतेने कोंबले असल्याचे दिसून आले. दरम्यान, पोलीस पथकाला पाहून चालक जमीर खान वहीद खान याने पळ काढला व काटेपूर्णा नदीच्या पुलावरून खाली उडी घेतली. त्यामध्ये तो जखमी झाला. त्यास उपचाराकरिता अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. याप्रकरणी मो. जहीर कुरेशी, मो. शारीक कुरेशी, फयाज मो. कुरेशी या तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईत ८८ हजार रुपये किमतीचे ११ बैल, पाच लाख रुपये किमतीचे मालवाहू वाहन, १४ हजार रुपये किमतीचे पाच मोबाइल असा एकूण सहा लाख दोन हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत ताब्यात घेतलेल्या ११ बैलांना अकोला येथील गोरक्षणमध्ये दाखल केले, अशी माहिती पथकप्रमुख अळासपुरे यांनी दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास बोरगाव मंजूचे ठाणेदार पी. के. काटकर करीत आहेत.

Web Title: To escape from arrest, jump from the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.