अत्यावश्यक सेवेत...पण लसीकरण केंद्रावर लस, पंपावर पेट्रोलही मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:16 AM2021-06-02T04:16:10+5:302021-06-02T04:16:10+5:30

जिल्ह्यातील एसटी कर्मचारी १७०० आतापर्यंत कोरोनाबाधित कर्मचारी ९८ कोरोनामुळे मृत्यू झालेले कर्मचारी ३ लसीकरण झालेले कर्मचारी ३७८ वयोमर्यादेनुसार केले ...

Essential services ... but no vaccine at the vaccination center, no petrol at the pump! | अत्यावश्यक सेवेत...पण लसीकरण केंद्रावर लस, पंपावर पेट्रोलही मिळेना!

अत्यावश्यक सेवेत...पण लसीकरण केंद्रावर लस, पंपावर पेट्रोलही मिळेना!

Next

जिल्ह्यातील एसटी कर्मचारी

१७००

आतापर्यंत कोरोनाबाधित कर्मचारी

९८

कोरोनामुळे मृत्यू झालेले कर्मचारी

लसीकरण झालेले कर्मचारी

३७८

वयोमर्यादेनुसार केले लसीकरण

४५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांना लसीकरण केंद्रात रांगेत उभे राहून लसीकरण घ्यावे लागत आहे. त्यात जाणारा वेळ आणि रांगेतही उभे असणाऱ्यांची मोठी संख्या पाहता अनेक कर्मचारी लसीकरण केंद्राकडेही जात नाहीत.

रांगेतून काढले बाहेर

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वयोमर्यादेत बसत नसलेला एखादा कर्मचारी रांगेत लागल्यास, त्याला रांगेतून बाहेर काढल्या जात असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

यादीत नाव नसल्याने पेट्रोल मिळेना!

एसटी महामंडळाची अत्यावश्यक सेवेसाठी प्रवासी वाहतूक सुरू आहे. तसेच माल वाहतूकही सुरू आहे. घरापासून एसटी आगारापर्यंत येण्यासाठी कर्मचाऱ्यांना स्वत:ची मोटरसायकल वापरावी लागते; परंतु अत्यावश्यक सेवेतील वेळेत या कर्मचाऱ्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळत नाही. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या यादीत तुमचे नाव नाही, असे सांगितले जाते.

शासनाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना वगळले आहे. कोरोना काळात एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी राजस्थान व इतर राज्यापर्यंत सेवा दिली; मात्र या कर्मचाऱ्यांना ना लस मिळते ना पेट्रोल. शासनाने एसटी कर्मचाऱ्यांचा फ्रंटलाइनमध्ये समावेश करावा.

- रुपम वाघमारे, विभागीय सचिव, एसटी संघटना.

Web Title: Essential services ... but no vaccine at the vaccination center, no petrol at the pump!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.