विद्यार्थांच्या सान्निध्यात साजरा झाला काटेपूर्णा अभयारण्याचा स्थापना दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:18 AM2021-02-10T04:18:03+5:302021-02-10T04:18:03+5:30
तसेच काटेपूर्णा अभयारण्यात अकोला व वाशिम येथील विज्ञान महाविद्यालयातील प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्राध्यपकांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन ...
तसेच काटेपूर्णा अभयारण्यात अकोला व वाशिम येथील विज्ञान महाविद्यालयातील प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्राध्यपकांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. अभ्यास दौऱ्यात श्री. शिवाजी महाविद्यालय, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, आर.एल.टी. सायन्स कॉलेज, अकोला, गुलाम नबी आजाद महाविद्याल, महात्मा फुले महाविद्यालय, पातूर येथील 20 प्राध्यापक व प्राध्यापिका सहभागी झाल्या होत्या. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपजीविका तज्ज्ञ प्रफुल्ल सावरकर यांनी मेळघाटातील विविध उपक्रमाची माहीिती दिली, तर डॉ. मिलिंद शिरभाते यांनी अभयारण्यातील संशोधनाच्या विविध संधी याबद्दल स्लाइड शोद्वारे माहिती दिली. अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व प्राध्यापकांना त्यांच्या महा विद्यालयातील विद्यार्थ्यांना काटेपुर्णातील जैवविविधतेचा अभ्यास करून घेण्यासाठी व त्यावर संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल सावंत यांनी केले, तर आभार वन परिश्रेत्र अधिकारी भानुदास पवार यांनी मानले.
शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. हेमंत सपकाळ, तुषार देशमुख, डॉ उज्ज्वला लांडे, तसगुल्म जैवविविधता संस्थेचे श्री. पुरुषोत्तम इंगळे व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.