कोरोना चाचणी अहवाल नसल्यास आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:19 AM2021-04-07T04:19:14+5:302021-04-07T04:19:14+5:30
कोरोना चाचणी करण्याकरिता येथील जयनारायण बूब हिंदी नगरपरिषद शाळा या ठिकाणी कोरोना चाचणी करून घ्यावी. आज, बुधवारी आस्थापना धारकांकडे ...
कोरोना चाचणी करण्याकरिता येथील जयनारायण बूब हिंदी नगरपरिषद शाळा या ठिकाणी कोरोना चाचणी करून घ्यावी. आज, बुधवारी आस्थापना धारकांकडे कोरोना चाचणी केल्याचा अहवाल नसेल, अशा आस्थापनाधारकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते व नगर परिषदचे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी दिल्या आहेत.
आस्थापना धारकांची व कामगारांची कोरोना चाचणी करून घ्यावी; अन्यथा आज, बुधवारी कडक कार्यवाही करण्यात येणार आहे, असे आवाहन मंगळवारी ध्वनिक्षेपकाद्वारे शहरात करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, नगर परिषदचे मुख्याधिकारी विजय लोहकरे, नायब तहसीलदार राजू डाबेराव, आरोग्य निरीक्षक विजय लकडे आणि मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व नगर परिषोचे कर्मचारी उपस्थित होते.