अकोला जिल्ह्यात २११ कार्यालयांमध्ये महिला तक्रार निवारण समित्या स्थापन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 01:52 PM2018-11-10T13:52:53+5:302018-11-10T13:52:56+5:30
अकोला: कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ अंतर्गत जिल्ह्यात २ नोव्हेंबरपर्यंत २११ कार्यालयांमध्ये अंतर्गत तक्रार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
अकोला: कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ अंतर्गत जिल्ह्यात २ नोव्हेंबरपर्यंत २११ कार्यालयांमध्ये अंतर्गत तक्रार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शासकीय, निमशासकीय आणि खासगी क्षेत्रातील कार्यालयांचा समावेश आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अनिधनियम २०१३ नुसार शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रातील कार्यालयात दहापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असलेल्या कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. तसेच दहापेक्षा कमी कर्मचारी कार्यरत असलेल्या कार्यालयांसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक तक्रार समिती स्थापन करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रातील एकूण २८५ कार्यालये आहेत. त्यापैकी २११ कार्यालयांमध्ये अंतर्गत तक्रार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. उर्वरित ७४ कार्यालयांमध्ये दहापेक्षा कमी कर्मचारी कार्यरत असल्याने, या कार्यालयांमध्ये अंतर्गत तक्रार समित्या स्थापन करण्यात आल्या नाही. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.