भलेही ‘नोटा’ बटन दाबा; पण मतदान करा - जनजागृतीकरिता ‘प्रहार’चे अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:58 PM2019-04-13T12:58:32+5:302019-04-13T12:58:42+5:30

अकोला: लोकसभा निवडणूक-२०१९ मध्ये मतदान करण्यासाठी मतदारांचा निरुत्साह दिसून येत आहे. अनेक मतदारांना उमेदवार पसंत नसल्यामुळे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत जाण्याचे टाळतात; मात्र उमेदवार पसंत नसतील तर प्रसंगी ‘नोटा’ बटन दाबा; पण यंदा मतदान कराच, मतदान जनजागृतीकरिता प्रहार संघटनेने अभियान हाती घेतले आहे.

Even if you press the 'Nota' button; But vote - campaign of 'Prahar' | भलेही ‘नोटा’ बटन दाबा; पण मतदान करा - जनजागृतीकरिता ‘प्रहार’चे अभियान

भलेही ‘नोटा’ बटन दाबा; पण मतदान करा - जनजागृतीकरिता ‘प्रहार’चे अभियान

googlenewsNext

अकोला: लोकसभा निवडणूक-२०१९ मध्ये मतदान करण्यासाठी मतदारांचा निरुत्साह दिसून येत आहे. अनेक मतदारांना उमेदवार पसंत नसल्यामुळे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत जाण्याचे टाळतात; मात्र उमेदवार पसंत नसतील तर प्रसंगी ‘नोटा’ बटन दाबा; पण यंदा मतदान कराच, मतदान जनजागृतीकरिता प्रहार संघटनेने अभियान हाती घेतले आहे. यासंदर्भात माहिती देण्याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख तुषार पुंडकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद बोलविली होती.
लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करा, जास्तीत जास्त संख्येने मतदान करा, असेदेखील मतदारांना पुंडकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन केले. अकोला जिल्ह्याच्या विद्यमान खासदारांनी मागील पंधरा वर्षांपासून कुठल्याच प्रकारचे विकास कार्य या जिल्ह्यामध्ये केले नाही. फक्त निवडणुकीच्या काळात जनतेसमोर येतात, तसेच मागील पंधरा वर्षांपासून प्रमुख पक्षांनी तेच ते उमेदवार दिल्यामुळे मतदारांमध्ये मतदानाविषयी कमालीचा निरुत्साह दिसून येत आहे. यामुळे जिल्ह्यात मतदान कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पुंडकर यांनी सांगितले.
मतदान न करणे हा काही पर्याय नाही. मतदान करणे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. लोकशाही वाचविण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवार पसंत नसेल तर निवडणूक आयोगाने दिलेल्या ‘नोटा’ हा पर्यायी विकल्प मतदार निवडू शकतो. या विकल्पाबाबत मतदारांना जागृत करणे, जनजागृती करणे, मतदानाची टक्केवारी वाढविणे, तसेच शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार व युवकांविरोधी धोरण आखणाऱ्या सरकारविरोधात प्रचार करणे हा ‘प्रहार’चा उद्देश असल्याचेदेखील पुंडकर यांनी स्पष्ट केले.
फसवी कर्जमाफी, नाफेडची तूर खरेदी, पीक विम्यात शेतकऱ्यांची फसवेगिरी व एक हजार रुपये तुरीच्या चुकाºयाबाबत शेतकºयांची दिशाभूल, अनुदानापासूनदेखील विद्यमान सरकारने शेतकºयांना वंचित ठेवले. अकोला जिल्ह्याचा विचार केला असता, मागील १५ वर्षांपासून केवळ जाती-धर्माच्या आधारावर येथे निवडणुका लढविल्या जात आहे. झेंड्याच्या रंगावरू न मतदान होत आहे, असा आरोप पुंडकर यांनी केला. ‘होय, माझे मत ‘नोटा’लाच’, हे अभियान फक्त अकोला जिल्ह्यापुरतेच प्रहार जनशक्ती पक्ष राबवित असल्याचेदेखील पुंडकर यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला युवक जिल्हाप्रमुख योगेश पाटील, नीलेश ठोकळ, अरविंद पाटील, संघटक श्याम राऊत, बिट्टू वाकोडे, बॉबी पळसपगार व उमेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
 

 

Web Title: Even if you press the 'Nota' button; But vote - campaign of 'Prahar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.