सम-विषमचा नियम रद्द; सर्वच दुकाने राहणार खुली; दर रविवारी संपूर्ण लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 07:53 PM2020-07-31T19:53:43+5:302020-07-31T20:04:18+5:30
दुकानांसाठी लावण्यात आलेला सम-विषम नियम रद्द करून आता दर सोमवार ते शनिवारपर्यंत सर्व बाजारपेठ खुली केली आहे.
अकोला : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन लावण्यात आलेल्या काही नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. अकोल्यात दुकानांसाठी लावण्यात आलेला सम-विषम नियम रद्द करून आता दर सोमवार ते शनिवारपर्यंत सर्व बाजारपेठ खुली केली आहे; मात्र दर रविवारी संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी जाहीर केला. त्यानुसार अकोला शहरासह जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात 31 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू राहील. बाजारपेठा, दुकाने, भाजीपाला, फळे यार्ड, पेट्रोल पंप, सलून, बँका आदी सर्व बाबतीत यापूर्वी लागू असलेले आदेश 31 ऑगस्टपर्यंत कायम राहतील. ऑगस्ट महिण्याच्या प्रत्येक रविवार कडक संचारबंदी लॉकडाऊन लागू राहिल. या पुर्वीच्या आदेशानुसार निर्बंधामध्ये देण्यात आलेली सुलभता व टप्पानिहाय लॉकडाऊन उघडण्याबाबतचे आदेश कायम ठेवून सुधारीत आदेश संपूर्ण अकोला शहर व जिल्हातील शहरी व ग्रामीण क्षेत्राकरिता लागू राहतील.
1. सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा अंतर्गत असेलली प्रतिष्ठाने, दुकाने व ज्यांना यापूर्वी सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे ती यापूढे सुध्दा नियमित सुरु राहतील.
2. दिनांक ३.६.२०२० नुसार रस्ता व गल्ली यांच्या एका बाजूला असलेली सर्व प्रकारची प्रतिष्ठाने ,दुकाने (मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स वगळून ) सम व विषम तारखेस सकाळी नऊ ते सात यावेळेत सुरु ठेवण्याबाबतचे आदेश रद्द करण्यात येत आहे. यापूढे दोन्ही बाजूची सर्व प्रकारची दुकाने, प्रतिष्ठाने सोमवार ते शनिवार (रविवार वगळून) सकाळी नऊ ते सायं. सात पर्यंत विहीत करण्यात आलेल्या अटी व शर्तीनुसार सुरु राहतील. या बाबत आयुक्त, महानगरपालिका व संबंधीत नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी नियोजन करावे.
3. सर्व प्रकारचे मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स हे खाद्यगृहे , रेस्टॉरेन्ट वगळता बुधवार दि. ५ ऑगष्ट २०२० पासून सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत सुरु राहतील तथापी अशा मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स मधील असलेली रेस्टॉरेंट मधील किचन व खाद्यगृहे यांना घरपोच सेवा देण्याकरिता परवानगी अनुज्ञेय राहील.
4. मद्यविक्री पूर्वीच्या आदेशानुसार सुरु राहील.
5. इ कॉमर्स क्षेत्राकरिता सर्व प्रकारच्या अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याकरिता परवानगी राहील.
6. महानगरपालिका,नगर परिषद,नगर पालिका क्षेत्रातील सर्वप्रकारची बांधकामे ( सार्वजनिक/खाजगी/शासकीय) ज्यांना परवानगी प्रदान करण्यात आलेली आहे ती सर्व सुरु राहतील. पावसाळयापूर्वी करावयाची सर्व प्रकारची ( सार्वजनिक/खाजगी/शासकीय) कामे सुरु राहतील.
7. रेस्टॉरेंट व खाद्यगृहे यांचेमार्फत घरपोच सेवा देता येतील.
8. ऑनलाईन शिक्षण व त्या संबंधीत उपक्रमांना परवानगी राहील.
9. स्वयंरोजगार उपक्रमासंबंधी असलेल्या व्यक्ती उदा. नळ कारागीर, ईलेक्ट्रीशिएन, किड नियंत्रक, तांत्रीक कामे करणारे यांना त्यांची कामे करण्याची परवानगी अनुज्ञेय राहील.
10. सर्व प्रकारचे वाहन दुरुस्ती गॅरेज , कार्यशाळा यांनी वाहन दुरुस्ती करिता ठराविक वेळ देवून कामे करावी .
11. अत्यावश्यक तसेच कार्यालयीन कामाकरिता जिल्हा अंतर्गत हालचाल करण्यास परवानगी अनुज्ञेय राहील.
12. ग्राहकांनी दुकानामध्ये खरेदी करण्याकरिता जवळपास असलेल्या बाजारपेठेचा वापर करावा. शक्यतो दुरचा प्रवास करुन खरेदी करणे टाळावे.
13. लग्न समारंभ व अंतिम संस्काराकरिता यापूर्वी पारीत करण्यात आलेले आदेश कायम ठेवण्यात येत आहे.
14. सर्व बाहय ठिकाणच्या सार्वजनिक हालचाली हया पूर्वी दिलेल्या निर्बधासह सुरु राहतील.
15. वृत्तपत्र व वृत्तपत्र छपाई व वितरणास घरपोच सेवासह परवानगी अनुज्ञेय राहील.
16. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये ( विद्यापिठ, महाविद्याल, शाळा ) येथील अशैक्षणिक कर्मचारी , संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना इमाहिती उत्तर पत्रिका तपासणे, निकाल घोषीत करणे इ. कामाकरिता परवानगी अनुज्ञेय राहील.
17. सर्व प्रकारची केशकर्तनालयाची दुकाने, सलुन, ब्युटीपालर्र या कार्यालयाचे पूर्वीचे आदेशानुसार सुरु राहतील.
18. बाहय असंघीक खेळ( Outdoor Games) उदा. गोल्फ, फायर रेन्ज, जिम्न्यॉस्टिक , टेनिस , बॅडमिंटन, मलखांब या खेळांना भौतिक व सामाजिक अंतर राखून तसेच निर्जतुंकीकरण व प्रतिबंधात्मक उपाययोजनासह दिनांक ५ ऑगष्ट २०२० पासून सुरु ठेवण्यास परवानगी अनुज्ञेय राहील. तथापी जलतरण तलाव यांना सुरु ठेवण्यास परवानगी राहणार नाही.
19. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक यांना टॅक्सी, कॅब व अॅग्रीगेटरसाठी अत्यावश्यक वेळे…