लसीकरणातही बेघर, भिकारी वाऱ्यावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:18 AM2021-03-05T04:18:53+5:302021-03-05T04:18:53+5:30
अकोला : नागरिक व ४५ ते ५९ वयाेगटांतील दुर्धर आजारी रुग्णांना काेविन लसीकरणाची माेहीम सुरू करण्यात ...
अकोला : नागरिक व ४५ ते ५९ वयाेगटांतील दुर्धर आजारी रुग्णांना काेविन लसीकरणाची माेहीम सुरू करण्यात आली आहे. या माेहिमेला ज्येष्ठांनी चांगला प्रतिसाद दिला असून, आराेग्य विभाग लसीकरणाचे केंद्र वाढविण्यासाेबतच ज्येष्ठांसाठी सुविधा देण्याबाबतही नियाेजन करत आहे दुसरीकडे शहरातील बेघर भिकाऱ्यांच्या लसीकरणाचेही आव्हान प्रशासनासमाेर उभे ठाकले आहे. बेघर भिकाऱ्यांच्या लसीकरणाबाबत आराेग्य विभागाकडे नियाेजनच नसल्याचे समाेर आले आहे
देशभरासह १ मार्चपासून ज्येष्ठांच्या कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. अकोल्यातही पहिल्या सत्रात कोविन ॲपमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे ज्येष्ठांना थोडा त्रास झाला. मात्र, त्यानंतर लसीकरणाचा वेग वाढला आहे आणखी काही केंद्र सुरळीत सुरू झाल्यानंतर ज्येष्ठांचे लसीकरण काही दिवसांतच पूर्ण हाेऊ शकेल असे आशादायक चित्र सध्या तरी दिसत आहे या लसीकरण मोहिमेत कोविन ॲपची महत्त्वाची भूमिका आहे. या ॲपमध्ये वयाची नाेंद आवश्यक असून, त्याकरिता आधार कार्ड आवश्यक असून, अनेक भिकाऱ्यांकडे आधार कार्डच नाहीत या पृष्ठभूमीवर शहरातील भिकारी तसेच बेघरांच्या लसीकरणाचाही प्रश्न आहे. वर्षभरापूर्वी हैदराबाद येथील व्ही-मॅक्स या संस्थेच्या मार्फत शासनाने अकाेल्यातील बेघर व भिकाऱ्यांचे सर्वेक्षण केले हाेते त्यामध्ये ७२ महिला ७६ पुरुष असे एकूण १४८ बेघर व भिकारी शहरात असल्याचे नाेंदविल्या गेले हाेते, मात्र सध्या महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या बेघर निवाऱ्यामध्ये केवळ ६२ बेघर भिकारी असून, ते सर्व ज्येष्ठ नागरिक या प्रवर्गातील आहेत यांचेही लसीकरण हाेणे आवश्यक आहे.
सर्व्हेनुसार संख्या १४८
बेघर निवाऱ्यात वास्तव्य ६२
महिला ३४, पुरुष २८
या अडचणींचे आव्हान
आधार कार्ड नाेंदणी नाही
आधार नाेंदणीसाठी अनेकांचे थम्ब इंप्रेशन हाेत नाही
बेघर भिकाऱ्यांची सदैव भटकंती
दुसरा डाेज देईपर्यंत सांभाळण्याची कसरत
काेट
महापालिकेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या गाडेगबाबा निवाऱ्यामधील १७ महिला व १६ पुरुष यांचे आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे उर्वरीत बेघरांचे थम्ब इंप्रेशन हाेत नाही काहींच्या डाेळ्यांच्या स्कनिंगचा प्रश्न आहे. ज्यांचे आधार कार्ड तयार हाेतील त्यांची लसीकरणासाठी नाेंदणी करणार आहाेत. उर्वरित बेघरांच्या बाबतीत वरिष्ठांकडून सूचनांनुसार निर्णय घेऊ
संजय राजनकर, शहर अभियान व्यवस्थापक, एनयूएमएम