अखेर व्हॅक्सिन चोरणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:54 AM2021-02-20T04:54:21+5:302021-02-20T04:54:21+5:30
खेट्री: पातूर तालुक्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालयातून कोविड-१९च्या सात व्हॅक्सिन चोरी गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणात चान्नी ...
खेट्री: पातूर तालुक्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालयातून कोविड-१९च्या सात व्हॅक्सिन चोरी गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणात चान्नी पोलिसांनी शुक्रवार, दि. १९ फेब्रुवारी आठव्या दिवशी एकाविरुद्ध गुन्हा दखल करून अटक केली.
चतारी ग्रामीण रुग्णालयातील सात व्हॅक्सिन लस चोरी गेल्याची घटना दि. १२ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. या प्रकरणात चार दिवसांनी मंगळवारी दि. १६ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा व्हॅक्सिन गहाळ झाल्याची तक्रार चान्नी पोलिसांत देण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठित केली. अखेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक स्वप्निल माहोरे यांच्या फिर्यादीवरून डाटा एंट्री ऑपरेटर दीपक ज्ञानदेव सोनटक्के (रा. वाडेगाव) याच्याविरुद्ध चान्नी पोलिसांनी भादंवीच्या ३८० कलमान्वये गुन्हा दाखल* करून अटक केली. या प्रकरणात आरोपी वाढण्याची दाट शक्यता आहे.
-------------------
चतारी येथील रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या फिर्यादीवरून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तसेच पुढील चौकशी सुरु आहे. तपासात जे काही निष्पन्न होईल त्या प्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल.
-राहुल वाघ, ठाणेदार पोलिस स्टेशन चान्नी