अखेर ग्रामपंचायतने अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:11 AM2021-02-05T06:11:58+5:302021-02-05T06:11:58+5:30

खेट्री येथे झोपडपट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून काही लोकांनी १५ फुटाचे अतिक्रमण केले होते. झोपडपट्टी भागात जाण्यासाठी गावातून ...

Eventually the Gram Panchayat removed the encroachment | अखेर ग्रामपंचायतने अतिक्रमण हटविले

अखेर ग्रामपंचायतने अतिक्रमण हटविले

Next

खेट्री येथे झोपडपट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून काही लोकांनी १५ फुटाचे अतिक्रमण केले होते.

झोपडपट्टी भागात जाण्यासाठी गावातून एकमेव रस्ता आहे. परंतु सदर रस्त्यावर काही लोकांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्ता अरुंद झाल्याचा आरोप झोपडपट्टीतील ग्रामस्थांनी केला होता. याबाबतचे वृत्त लोकमतने २ जानेवारी रोजीच्या अंकात प्रकाशित करताच, संबंधी स्थानिक प्रशासनाने अतिक्रमण करणाऱ्यांना ५ जानेवारी रोजी नोटीस बजावून १ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतने आठ अ प्रमाणे मोजमाप करून अतिक्रमण हटविले. झोपडपट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्याचे नमुना आठ "अ" प्रमाणे जागेची मोजमाप करून जेवढा अतिक्रमण हटविले.

रेश्मा बी अब्दुल शमीम, सरपंच खेट्री

रस्त्यावर केलेले पूर्ण अतिक्रमण काढण्यात आले नाही. अर्धवट अतिक्रमण हटविण्यात आले आहे. न्यायालयात प्रकरण दाखल करून न्याय मागण्यात येईल

जहुर खां लाल खां तक्रारदार खेट्री*

Web Title: Eventually the Gram Panchayat removed the encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.