प्रत्येक नागरीकांनी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक - नरेंद्र लोणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 03:41 PM2019-01-25T15:41:05+5:302019-01-25T15:44:12+5:30

अकोला : संविधानाप्रमाणे भारतीय नागरीकांना मतदानाचा हक्क प्राप्त झालेला आहे. त्यामुळे भारतीय लोकशाही ही मजबुत करण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र लोणकर यांनी केले.

 Every citizen must perform voting right - Narendra Lonkar | प्रत्येक नागरीकांनी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक - नरेंद्र लोणकर

प्रत्येक नागरीकांनी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक - नरेंद्र लोणकर

googlenewsNext

अकोला : संविधानाप्रमाणे भारतीय नागरीकांना मतदानाचा हक्क प्राप्त झालेला आहे. त्यामुळे भारतीय लोकशाही ही मजबुत करण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र लोणकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे , निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी निलेश अपार , उपजिल्हाधिकारी शिवाजी दावभट, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उप निवडणूक अधिकारी वैशाली देवकर, जिल्हा सातत्यपुर्ण शैक्षणिक व व्यवसायीक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव, विभागीय वन प्राधिकारी मनोज खैरनार , राज्य उत्पादन शुल्काचे अधिक्षक राजेश कवडे, तहसिलदार विजय लोखंडे, शहरपक्षी निवडणूक संयोजक अमोल सावंत , नायब तहसिलदार सतिश काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, अनेक देशानी आपला विकास करतांना नैतीक मुल्यांना तिलांजली दिली, परंतू भारताने आपली लोकशाही टिकवून प्रगती केली आहे. हेच आपल्या देशाचे बळकट स्थान असल्याचे त्यांनी सांगीतले. मागील 70 वर्षात आपली लोकशाही प्रगल्भ झाली असून यासाठी आपल्या लोकप्रतिनिधीचे चांगले कार्य केले असल्?याचे जिल्हाधिकारी यांनी सांगीतले.लोकप्रतिनिधी शिक्षीत असो वा अशिक्षीत असो परंतू मतदार हा सुशिक्षीत असावा असे मत श्री. लोणकर यांनी व्यक्त केले. नागरीकांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करावे असे सांगुन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनचे कोणत्याही पध्दतीने हँकींग होत नाही. तरी नागरीकांनी अफवांना बळी पडु नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन बाबत प्रत्येक गावात जाऊन जनसामान्यात जनजागृती करण्यात येत असल्याची त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसिलदार सतिश काळे यांनी तर सुत्रसंचालन प्रकाश अंधारे यांनी केले. उपस्थिताचे आभार तहसिलदार विजय लोखंडे यांनी मानले.

विविध स्पधेर्तील गुणवंतांचा गौरव

यावेळी मतदार जन जागृतीसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पधेर्तील गुणवंतांचा गौरव प्रमाणपत्र देवून करण्यात आला. या वेळी उत्कृष्ठ जाहिरनामा स्पर्धेत न्यु इंग्लिश हायस्कुलचे सिध्दार्थ डोईफोळे यांना प्रथम, बालशिवाजीचे अनुराग देशपांडे यांना व्दितीय, भारत विदयालयाची जान्हवी वानखडे तृतीय तर आरएलटी कॉलेजची आरती कडू यांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले. उत्कृष्ठ पोस्टर स्पर्धेत प्राजक्ता कन्या शाळेची दिव्या लाड यांना प्रथम , न्यु इंग्लिशची पायल गांवडे व्दितीय,ऋषिकेश चव्हाण तृतीय तर जुबली हायस्कुलची ऋतुजा बिडवाई यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. रांगोळी स्पर्धेत विद्या घाटोळ, उमा गावंडे, शुभांगी काकड ,वंदना वानखडे यांचा गौरव करण्यात आला.
बॉक्सींग स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व करणारे गौरी जयसिंगपुरे व साक्षी गायधनी यांचा अग्रणी दुत म्हणुन सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.वादविवाद स्पर्धेत गौरविण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी सानिका जुमडे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी शंकरलाल खंडेलवाल महाविदयालय व शिवाजी महाविदयालय यांच्या मार्फत मतदान जनजागृतीसाठी पथनाटय सादर करण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी राष्ट्रीय दिनानिमित्त शपथ घेतली. या कार्यक्रमाला विविध विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, मतदार, गुणवंत विद्यार्थी तसेच नागरिक उपस्थित होते.
यासाठी निसर्ग कट्टा , सामाजिक वनीकरण , महाराष्ट्र पक्षी मित्र, आधार फाउंडेशन , अंजिक्य साहसी क्लब , मॅराथॉन नेचर क्लब, खंडेलवाल महाविदयालय , शिवाजी महाविदयालय , आरएलटी महाविदयालय व सृष्टी वैभव या संस्थानी सहकार्य केले. तसेच पक्षी मित्र दिपक जोशी , उदय वझे, देवेंद्र तेलकर , संदीप साखरे , संदिप सरडे , अतुल जवळेकर, अजय फाळे यांनी सहकार्य केले.


विदयार्थ्यांच्या रॅलीने दुमदूमले शहर
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज सकाळी शास्त्री स्टेडीयम येथून विदयार्थ्यांची रॅली काढण्यात आली. विविध शाळा, महाविदयालयाचे विदयार्थी रॅलीत सहभागी झाले होते. प्र. जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयात झाला.

 

Web Title:  Every citizen must perform voting right - Narendra Lonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.