प्रत्येक शिवार फुलावे!

By admin | Published: January 30, 2015 01:34 AM2015-01-30T01:34:44+5:302015-01-30T01:34:44+5:30

लोकमत परिचर्चेत तज्ज्ञांचे मत; जलयुक्त शिवार अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप यावे.

Every shiver flower! | प्रत्येक शिवार फुलावे!

प्रत्येक शिवार फुलावे!

Next

अकोला : जलयुक्त शिवार अभियानाला सक्रिय लोकसहभागातून लोकचळवळीचे स्वरूप यावे आणि त्यामधून जिल्ह्यातील प्रत्येकाचे शिवार फुलावे, असा सूर गुरुवारी ह्यलोकमतह्णच्यावतीने आयोजित परिचर्चेत उमटला. राज्यात वारंवार उद्भवणार्‍या टंचाईच्या स्थितीवर मात करण्याकरिता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासनामार्फत राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत्जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांबाबत ह्यलोकमतह्णच्यावतीने आयोजित परिचर्चेत ह्यकृषिभूषणह्ण शेतकरी दादाराव देशमुख, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जल व मृद् संधारण विभागाचे प्रमुख डॉ. सुभाष टाले, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे, तालुका कृषी अधिकारी एम. डी. जंजाळ, जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे उपकार्यकारी अभियंता डी. एस. मडावी, तालुका 'आत्मा' समितीचे अध्यक्ष हेमंत देशमुख, पातूर येथील शेतकरी नामदेवराव अढाऊ, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी एस.एम.देशमुख आदी तज्ज्ञांनी विचार मांडले. जलयुक्त शिवार अभियानाद्वारे पावसाचे पाणी अडविणे आणि जिरविण्यासाठी उपाययोजनांना प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी जलसाक्षरतेची व लोकसहभागाची आवश्यकता आहे. त्याद्वारे जलयुक्त शिवार अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप यावे, असा सूर यावेळी उमटला.

Web Title: Every shiver flower!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.